हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून डॉ. सुजित मिणचेकर यांना निवडून आणणारच- डॉ.विशाल साजणीकर
(दिशा महाराष्ट्राची/ हातकणंगले)
यंदा येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून डॉ. सुजित मिणचेकर यांना यंदा रात्रीचा दिवस करून निवडून आणणार असल्याचा हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील युवा वर्गाच्या वतीने आमदार डॉ. सुजित मिणचेकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. विशाल साजणीकर यांनी विश्वास व्यक्त केला.
डॉ. सुजित मिणचेकर यांनी मागिल 10 वर्ष प्रतिनिधीत्व करत मागेल त्याला फंड मागेल त्याला कामे ना तो कोणत्या जातीचा ना तो कोणत्या धर्माचा ना तो कोणत्या पक्षाचा ना गटाचा असा भेदभाव न करता विकासाला नेहमीच चालना दिले आहे. हातकणंगले तालुक्याच्या विकासाची गंगा ही डॉ. मिणचेकरांनी सुरू केली. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये रस्ते ,भौतिक सुविधा, धार्मिक स्थळे अशी अन्य अनेक कामे त्यांनी केलेली आहेत आणि त्याला नेहमी मदत ही डॉ. मिणचेकरांनी केलेली आहे.
सध्या हातकणंगले तालुक्यात वाढता युवकांचा पाठिंबा तसेच प्रत्येक गावातील लोकांच्या हक्कासाठी लढणारा नेतृत्व म्हणून डॉ. मिणचेकर यांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असल्याने आणि गोकुळच्या माध्यमातून गेली पाच वर्षे लोकांशी सतत असलेला संपर्क मागच्या निवडणुकीत पराभव होऊ नये गेली पाच वर्ष सातत्याने आमदार डॉ. सुजित मिणचेकर जनसंपर्क कार्यालय सुरू असून लोकांच्या विकासाची काम अद्यापही थांबलेली नाहीत. यामुळे सहजच भेटणारा नेता म्हणून डॉ. मिणचेकर यांची ख्याती आहे.
सध्याची लोकांची जरी कानावरती चर्चा असली महाविकास आघाडी झाली तर काय होणार मात्र काहीही झालं तरी डॉ. सुजित मिणचेकर हे निवडणूक लढविणार यात तीळ मात्र शंका नाही. यंदा मात्र किमान 30 हजाराच लीड असेल असे पत्रकारांशी बोलताना प्रा. डॉ. विशाल साजणीकर यांनी सांगितले.