पालशेत ते बोऱ्या विभागात मनसेच्या वतीने गणेश आरती आणि गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन
(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर- उदय दणदणे)
कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचे औचित्य साधत महाराष्ट्रातील संस्कृती,कलेवर निस्सीम प्रेम करणारे उद्योजक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कला, संस्कृती, सणाचं महत्त्व, पारंपरिकता जपली जावी यासाठी संपूर्ण गुहागर विधानसभा मतदारसंघात सर्वत्र गणेशोत्सव विशेष स्पर्धा राबविण्यात येत आहेत.
मनसेचे प्रमोद गांधी यांनी गुहागर मनसे कार्यकर्ते,पदाधिकारी यांना गणेशोत्सवात विशेष स्पर्धा राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गुहागर मतदार संघातील पंचायत गण, जिल्हा परिषद गटात, गाव विभागात पातळीवर गुहागर मनसेने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
पालशेत गटात पालशेत/ निवोशी/ अडूर/ नागझरी/ कोंडकारूळ/ बुधल/ बोऱ्या, गाव मर्यादित, महाराष्ट्र नवनिर्माण सेना- गुहागर संपर्क अध्यक्ष: प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शन सौजन्याने “गणेश आरती व गौरी सजावट स्पर्धा- २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे. पुढीलप्रमाणे स्पर्धेचे स्वरूप, अटी नियम असणार आहेत.
गणेश आरती स्पर्धा: घरगुती / सामाईकरित्या वाडी किंवा ग्रुप समूहाने केलेल्या गणेश आरतीची ३ मिनिटांचे व्हिडिओ शुटिंग आणि सोबत एक फोटो, विजेत्यांना पारितोषिक रोख रक्कम/सन्मान चिन्ह, प्रथम: ३०००/-द्वितीय:२०००/- तृतीय:१०००/-
गौरी सजावट स्पर्धा: घरगुती अथवा भावकी/वाडीतील गौरी मुखवटे पारंपरिक वेशभूषा व अलंकाराने सजवलेला मकारातील १ फोटो आणि सोबत घरगुती अथवा सामायिकरित्या महिलांचा एक फोटो असे एकूण दोन फोटो, विजेत्यांना पारितोषिक रोख रक्कम/सन्मानचिन्ह,प्रथम: ३०००/- द्वितीय: २०००/-तृतीय:१००० /-सूचना/नियम
१) फोटो / व्हिडिओ शूटिंग मोबाईल कॅमेऱ्यातून शूट केलेले असावेत
२) फोटो /व्हिडिओ आयताकृतीत म्हणजेच आडवे शूट केलेले असावेत,
३)सदर व्हिडीओ /फोटो परीक्षकांडून निरीक्षण होऊनच विजयी स्पर्धक जाहीर करण्यात येतील.
४) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक ११ /०९/ २०२४ रोजी पर्यंत घरगुती अथवा ग्रुप समूहाचे नाव नोंदणी करणे आवश्यक
५) आपले व्हिडीओ / फोटो दिनांक १२ /०९/२०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पुढील दिलेल्या मोबाईल नंबरवर पाठविणे बंधनकारक राहील,
संपर्क:
प्रसाद विखारे-९५५२७०४७१४,विगनेश भायनाक-९५९४२०६१६८,त्याचबरोबर आपल्या गाववाडी वस्तीवरील समस्यांसाठी मनसे गुहागर जनसंपर्क: ९०९०४८८४८८ या नंबरवर संपर्क साधावा. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करत गुहागर मनसे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.