Home शैक्षणिक मुंडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उद्‌बोधन वर्ग संपन्न

मुंडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उद्‌बोधन वर्ग संपन्न

Spread the love


मुंडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उद्‌बोधन वर्ग संपन्न



(दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड)


 

मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यानिमित्ताने विद्यार्थांना उद्‌बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव होते. यावेळी डॉ. विष्णू जायभाये, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. महेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. यानंतर प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे यांनी सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाबरोबच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत केले जाते. स्वतःचे व्यक्तिमत्व घडवत समाजसेवेची संधी यातून विद्यार्थ्यांना मिळत असते, पण त्यासाठी मेहनत करण्याची तयारी असावी लागते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेची कार्यपद्धती, उद्दिष्टे, प्रशासकीय संरचना, विभागामार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, घोषवाक्य व बोधचिन्ह तसेच वर्षाअखेरीस स्वयंसेवकांचे केले जाणारे मूल्यमापन आदींबाबत सविस्तर माहिती पी.पी. टी. च्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच गेल्या पाच वर्षात या विभागामार्फत राबविले गेलेले विविध उपक्रम आदींबाबत माहिती दिली.

Related Posts

Leave a Comment