कवी अविनाश ठाकूर साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृतगौरव पुरस्कार २०२४ ने सन्मानित
(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)
प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार सोहळा 2024 मध्ये डोंबिवली, ठाणे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश शामराव ठाकूर यांना साहित्यरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.कवी अविनाश ठाकूर यांनी साहित्यक्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल आजवर अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सदर पुरस्कार प्रसंगी प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार 2024 समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब तोरसकर, ज्येष्ठ साहित्यिक मुंबई, उद्घाटक ख.र. माळवे (महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती) स्वागताध्यक्ष प्राध्यापक नागेश हुलावळे (अध्यक्ष वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई) प्रमुख पाहुणे डॉक्टर जी. डी. यादव (अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था) डॉ.डेरिक एंजल्स (नासा शास्त्रज्ञ), डॉक्टर सुकृत खांडेकर (दैनिक प्रहार संपादक) श्री प्रमोद महाडिक नॅशनल लायब्ररी आणि डॉक्टर नान्सी अल्यूकर्स इत्यादी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 25 ऑगस्टला नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद सूर्यवंशी, रमेश पाटील, योगेश हरणे यांनी केले होते.संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.