Home कविता कविता- सवय
Spread the love

सवय



(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई)


सवय होती रोजची तुझी

पण आता दिवस मात्र नवीन सुरू झाले

मनात कोंडलेल्या या विचारांना

आता नवीन रस्ता दाखऊ लागले

 

सोबत नसतानाही

सोबत असल्याचे भास होऊ लागले

आठवण आली तुझी की

मनाला समजावू लागते

 

जास्त दिवस नाही बोलले तुझ्याशी

पण त्या दिवसातच तुझी होऊन गेले

सहवास नाही भेटला तुझा

तुझे भास मात्र नेहमी होऊ लागले

 

आताही तुझाच विचार करतेय

तुझ्याच आठवणींमध्ये रमतेय

तू नाही बोलणार आहेस

त्याची सवय करून घेतेय

 

मला म्हाईत आहे की मी चुकले

पण त्यामागे तुला दुखवायचा हेतू नव्हता

एकदा समजून घेतल असतस

तर तू माझ्या सोबत असतास

 

सवय लागली होती तुझी

पण आता नक्की स्वतःला सावरेन

तू नाही आहेस तरीही

तुझ्या आठवणी मी जपून ठेवेन

 

नाव – मेघना गांधी

Related Posts

Leave a Comment