Home साहित्य माननीय गंगाधर धुवाधपारे यांना समाजरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्रदान 

माननीय गंगाधर धुवाधपारे यांना समाजरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्रदान 

Spread the love

माननीय गंगाधर धुवाधपारे यांना समाजरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्रदान



(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई)


 

प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य आयोजित पुरस्कार २०२४ साठी गोंदिया येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तसेच उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोलीचे संस्थापक गंगाधर धुवाधपारे यांना समाजरत्न प्रजासत्ताक गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

        सामाजिक कार्यकर्ते गंगाधर धुवाधपारे यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबई बांद्रा पश्चिम नॅशनल लायब्ररी सभागृह स्वामी विवेकानंद रोड, एस व्ही रोड येथे २५ ऑगस्ट २०२४ ला कार्यक्रम अध्यक्ष ज्येष्ठ लेखक बाळासाहेब तोरस्कर, लेखक कवी डॉ खंडू माळवे मुंबई, पद्मश्री पुरस्कारविजेते डी. जी. यादव, भानुदास केसरे, प्रमोद महाडिक, डॉ. सुकृत खांडेकर, राजेश कांबळे, डॉ. नॅन्सी अल्बुकर्क, रामकृष्ण कोळवणकर, डॉ. रेडिक एंजल्स, आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी मुख्य संयोजक समितीचे पदाधिकारी मा. नागेश हुलावळे संस्थापक, वर्ल्ड व्हिजन संस्था, मुंबई, नॅशनल लायब्ररी, डी. पी. ई. सोसायटी, बांद्रा नाईट हायस्कूल त्याचप्रमाणे रमेश मारुती पाटील लेखक कोल्हापूर, प्रमोद सूर्यवंशी मुंबई, योगेश हरणे पुणे, व आयोजक समितीचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment