कवियत्री,लेखिका,सुत्रसंचालिका, शिक्षिका सौ. योगिता संदीप जाधव यांना साहित्यरत्न अमृत गौरव पुरस्कार प्रदान
(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई)
प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार २०२४ समिती महाराष्ट्र राज्य आयोजित अध्यक्ष डॉ. बाळासाहेब तोरस्कर ज्येष्ठ साहित्यिक मुंबई. उद्घाटक डॉ. खर मावळे.(उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती) स्वागताध्यक्ष प्रा. नागेश हुलवळे. (अध्यक्ष वर्ल्ड विजन संस्था मुंबई.) प्रमुख पाहुणे डॉक्टर जी डी यादव.अध्यक्ष (राष्ट्रीय विज्ञान संस्था)डॉ. डेरीक एंजल्स (नासा शास्त्रज्ञ)डॉक्टर सुकृत खांडेकर.(दैनिक प्रहार संपादक)श्री प्रमोद महाडिक (नॅशनल लायब्ररी)श्री भानुदास केसरे, रामकृष्ण कोळवणकर, श्री. राजेश कांबळे. तसेच डॉक्टर नॅन्सी अल्ब्युकर्स हे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते सौ. योगिता संदीप जाधव यांचा त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन साहित्यरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्यांना साहित्य गौरव, सामाजिक शैक्षणिक साहित्य म्हणून १३वे अखिल भारतीय प्रतिभा संमेलन- २०२० पुणे यांच्या कडून भारत गौरव प्रतिभा पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या फुलपाखरू या काव्यसंग्रहाला हल्लीच शांता शेळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
त्यांची सामजिक विषयाला हात घालणारी शॉर्ट फिल्म लवकरच सर्वांना पाहायला मिळणार आहे .त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीची दक्खल घेतल्याबद्दल व प्रोत्साहन पर पुरस्कार दिल्या बद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार त्यांनी मानलेत.
आयोजकांमध्ये मा. प्रमोद सूर्यवंशी, मा. योगेश पाटील मा. योगेश हरणे यांचे धन्यवाद. हा भव्य सोहळा बांद्रा नॅशनल लायब्ररी येथे संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.