श्री गणेश भराडेश्वर मित्र मंडळ (रजि.) गाव कर्दे खालची वाडी आयोजित पाण्याची समस्या सोडवण्यासाठी कोकणची लोककला शक्ती- तुरा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर- नरेश मोरे)
रत्नागिरी जिल्हातील गुहागर तालुक्यातील श्री गणेश भराडेश्वर मित्र मंडळ (रजि.) गाव कर्दे खालची वाडी या मंडळाने पाण्याची समस्या सोडवण्यासाठी सरकारी जल जीवन मिशन योजना राबवली पण, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी नियमानुसार आमच्या वाडीला १०% रक्कम भरून या योजनेचा लाभ घेता येईल असे सांगण्यात आले. पण वाडीमध्ये गावी राहणारे कुटुंब आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आमचे मंडळ सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रिडा कार्यक्रमांचे आयोजन करून जे भांडवल जमा होते ते भांडवल वाडीतील गोर- गरीब कुटुंब आहेत. त्यांना मंडळा मार्फत आर्थिक मदत केली जाते.
या कुटुंबांचा जल-जिवन योजनेचा आर्थिक भार कमी करण्यासाठी मंडळाने मुंबई ठिकाणी मास्टर दीनानाथ मंगेश नाट्यगृह विलेपार्ले (पुर्व ) २१ ऑगस्ट २०२४ रोजी डबलबारी शक्ती तु-याचा जंगी सामना आयोजित केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री प्रमोदजी गांधी साहेब (मनसे- गुहागर तालुका संपर्क प्रमुख) यांच्या हस्ते दिप- प्रज्वलन आणि रंगमंचाला श्रीफळ देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
त्याचप्रमाणे शक्तीवाले शाहीर बिनेश वाजे यांनी मंडळावरून गीत गायले आणि बदलापूर या ठिकाणी झालेल्या घटनेवर गाण्यातून निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर ज्ञानदीप भोईनकर सर यांनीही जलजिवन मिशन योजना राबविण्याचा हेतू काय आणि पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन वणवण फिरावे लागते हे बोल गितातून साजर केले. अशा प्रकारे पहिली बारी झाल्यानंतर श्री गणेश भराडेश्वर मित्र मंडळाचे संस्थापक श्री अर्जुन गणू पंडये यांना सन्मानचिन्ह, शाळ, पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
हरी ओम नृत्य कलापथक- मानकर बुवा कार्यकारणी मंडळ, शक्तीवाले शाहीर बिनेश वाजे(बुवा), तुरेवाले शाहीर ज्ञानदीप भोईनकर , मा. श्री प्रमोदजी गांधी साहेब, शिव स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी या संघटनेचे अध्यक्ष विलास सुवरे साहेब आभारपञ,पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी लागलेले विशेष सहकार्य आमच्या कर्दे गावातील श्री दशभुज ट्रॅव्हल्सचे मालक अशोकजी येद्रे साहेब यांनचे ही मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.
त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी मा. श्री संतोषजी जैतापकर साहेब, श्री दिपकजी कारकर साहेब( पञकार), श्री दिपकजी मांडवकर साहेब (पञकार), समाजसेवक निलेश कुळये यांचे ही आभार मानले. तसेच या मंडळाची गाव कमेटी आणि ग्रामपंचायत सदस्य श्री विवेकजी बारस्कर साहेब, श्री रामचंद्र बारस्कर साहेब, श्री नितीनजी जोयशी साहेब, श्री निवास तिवारी साहेब, श्री मनोहर बारस्कर साहेब आणि इतर आलेल्या सर्व देणगी दारांनचे विशेष आभार मानण्यात आले.
त्याप्रमाणे गावातील गावकरी मंडळी, महीला वर्ग त्याचप्रमाणे आमच्या मंडळातील वरिष्ठ मंडळी, महीला, पुरूष, तरूण- तरूणी यांनचे ही शाब्दीक आभार मानून दुसरी बारी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली. अशाप्रकारे एकंदरीत शक्ती तु-याचा जंगी सामन्याचा कार्यक्रम मोठ्या आनंद पार पडला.