Home धार्मिक रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनची कार्यकारीणी जाहीर

रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनची कार्यकारीणी जाहीर

Spread the love

रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनची कार्यकारीणी जाहीर

 



(दिशा महाराष्ट्राची/ दापोली)


  हिंदू धर्मामध्ये पुरातन काळापासून कृष्णलीला पाहण्यास व ऐकिवात आल्या आहेत. दहीहंडी, गोपाळकाला हा उत्सव मोठ्या उत्साहाने व थरावर थर लावून जोखीम पत्करून दरवर्षी नित्याने साजरा केला जातो. 5 थर , 6 थर एवढेच नव्हे तर 8 आणि 9 थर लावून हंडी फोडणारे गोविंदा पथक ही तयार झाले आहेत. यामध्ये अनेक वेळा गोविंदा खेळाडू जखमी व कायम अपंगत्व निर्माण झालेले दिसून येतात.

    गोविंदा पथकांना विमा संरक्षण देणे, दहीहंडी हा साहसी खेळ म्हणून सामाविष्ट करून घेणे, प्रो गोविंदा सारख्या स्पर्धा आयोजित करणे, योग्य पारितोषिके मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणे याकरिता भक्कम व सक्षम अशी संस्था गोविंदा पथक व खेळाडू यांच्या सदैव पाठीशी राहण्यासाठी रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशन 2024 मध्ये स्थापन करण्यात आली.

    रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशन ही संस्था यावर्षी प्रथमच रजिस्टर करण्यात आली आहे. या संस्थेचे अध्यक्ष श्री. अक्षय फाटक (दापोली), उपाध्यक्ष- श्री. संतोष दामुष्टे (संगमेश्वर), सौ. निधी भडवळकर (दापोली) , श्री. कुलभूषण कुलकर्णी (चिपळूण) , सचिव- श्री. आशुतोष साळुंखे (खेड), सहसचिव- श्री. सतीश महाडिक (रत्नागिरी) , खजिनदार- श्री. नरेंद्र भडवळकर (दापोली) व सदस्य- श्री. विक्रांत पाटील (खेड), श्री. स्वप्नील सैतवडेकर (खेड), श्री. सचिन सकपाळ (मंडणगड) , श्री.विरेंद्र लिंगावळे (दापोली) , श्री. मयूर मोहिते (दापोली), श्री. योगेश हुंबरे (चिपळूण) ,श्री. सुबोध पवार (राजापूर), श्री. प्रितम नरवणकर (रत्नागिरी) यांची कार्यकारीणी मंडळावर निवड झाली.

    रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशन मध्ये निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांचेवर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून येत आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली दहीहंडी बाबत सर्व नियमांचे पालन करण्याचे संकेत रत्नागिरी जिल्हा दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे सन्मा. अध्यक्ष श्री. अक्षय फाटक यांनी दिले आहेत.

Related Posts

Leave a Comment