Home सामाजिक पालशेत मुख्य रस्त्यावरील स्ट्रीटलाइट बंद ; ग्रामपंचायत प्रशासक यांना मनसेचे निवेदन

पालशेत मुख्य रस्त्यावरील स्ट्रीटलाइट बंद ; ग्रामपंचायत प्रशासक यांना मनसेचे निवेदन

Spread the love

पालशेत मुख्य रस्त्यावरील स्ट्रीटलाइट बंद ; ग्रामपंचायत प्रशासक यांना मनसेचे निवेदन

 



 

(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर- उदय दणदणे)


 

गुहागर तालुक्यातील पालशेत निवोशी ग्रामपंचायत महसूल क्षेत्रातील अनेक विद्युत पथदिवे बंद असल्याचे तसेच सौरऊर्जेवरील अनेक वाडी वस्तीच्या ठिकाणचे दिवे बंद असल्याचे पाहायला मिळते.प्रामुख्याने भरवस्ती असलेले पालशेत बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील विद्युत पथ दिवे गेले काही महिने बंद असल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

सदरबाबत कोंडकारूळ मनसेचे विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे (पालशेत ) यांनी दखल घेतली असून शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी प्रशासक, ग्रामपंचायत पालशेत- निवोशी यांना सदर बाबत निवेदन देत गणेशोत्सवपूर्व बंद असलेल्या स्ट्रीटटलाईट सुरू करण्याची विनंती केली आहे.

निवेदन देताना मनसे विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे यांच्यासह यश पालशेतकर, श्रीजल जोशी आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment