Home शैक्षणिक मुंडे महाविद्यालयातील प्रा. सुरज बुलाखे यांना पीएच. डी. पदवी प्रदान

मुंडे महाविद्यालयातील प्रा. सुरज बुलाखे यांना पीएच. डी. पदवी प्रदान

Spread the love

मुंडे महाविद्यालयातील प्रा. सुरज बुलाखे यांना पीएच. डी. पदवी प्रदान

 



(दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड)



 

मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ‘भौतिकशास्त्र’ विषयाचे विभागप्रमुख प्रा. सुरज बुलाखे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथून नुकतीच पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ‘‘स्टडीज ऑन ट्रान्झिशन मेटल ऑक्साईड थिन फिल्म फॉर वॉटर स्प्लीटींग एप्लिकेशन्स’ या विषयावरील शोधप्रबंध विद्यापीठास सादर केला होता.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. रमेश देवकाते यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयात छोटेखाणी कार्याक्रमाध्ये प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. सुरज बुलाखे यांनी सदर शोधप्रबंधामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन मूल्यमापन यांनासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये संशोधन करताना पाण्याचे विभाजन करण्यासाठी आवश्यक असणा-या संक्रमण धातू ऑक्साईड उत्प्रेरकांचा सखोल अभ्यास केला व हायड्रोजनसारख्या पर्यावरणपूरक इंधनाच्या उत्पादनासाठी या उत्प्रेरकांचा यशस्वीपणे वापर करता येवू शकतो हे आपल्या संशोधनातून नमुद केले. 

प्रा. बुलाखे हे मागील अकरा वर्षापासून मंडणगड येथील लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून ‘भौतिकशास्त्र’ या विषयातून एम्. एस्सी. पदवी प्राप्त केली असून ते भारत सरकारची युजीसी-सीएसआयआर नेट परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. तसेच त्यांनी भौतिकशास्त्राशी निगडीत विविध विषयांवर संशोधनपर लेख प्रकाशित व विविध आतंरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केले आहेत. 

त्यांच्या या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, संस्थाध्यक्षा सौ. संपदाताई पारकर, कार्याध्यक्ष श्री. श्रीराम इदाते, कार्यवाह प्रा. सतीश शेठ, सर्व संस्थापदाधिकारी, प्राचार्य डॉ. राहूल जाधव, सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

Related Posts

Leave a Comment