Home शैक्षणिक युवकांनी स्वातंत्र्य, संविधान आणि तिरंगा याविषयीची जनजागृती करावी- पद्मश्री कर्मवीर दादा इदाते

युवकांनी स्वातंत्र्य, संविधान आणि तिरंगा याविषयीची जनजागृती करावी- पद्मश्री कर्मवीर दादा इदाते

Spread the love

युवकांनी स्वातंत्र्य, संविधान आणि तिरंगा याविषयीची जनजागृती करावी- पद्मश्री कर्मवीर दादा इदाते

 



दिशा महाराष्ट्राची – मंडणगड प्रतिनिधी

 

‘‘प्रचंड संघर्ष व रक्तरंजित अवस्थेतून भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. तिरंगा हे शांतता, समृद्धी व एकात्मता यांचे प्रतीक आहे. याची जाणीव ठेऊन महाविद्यालयीन युवकांनी आपले स्वातंत्र्य, भारतीय संविधान व तिरंगा याविषयी समाजामध्ये जनजागृती करावी व देशाला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करावेत’ असे आवाहन पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी केले. ते येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘हर घर तिरंगा’ अभियान कार्यक्रमातंर्गत ‘भारतीय स्वातंत्र्य लढयाचे महत्त्व आणि आजचे संदर्भ’ या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते. 

‘भारतीय स्वातंत्र्य लढयाचे महत्त्व आणि आजचे संदर्भ’ या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले की, 1857 च्या स्वातंत्र्य युद्धापासून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी देशव्यापी प्रयत्न सुरू झाले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, नेताजी सुभाशचंद्र बोस यांच्यासारख्या असंख्य वीरांनी आपले योगदान दिले आहे. भारतीय असंतोषांचे जनक असलेल्या लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच! हा मंत्र देशाला दिला. सामाजिक व सांस्कृतिक जागृतीसाठी त्यांनी शिवजयंती व गणोशोत्सव सारखे उपक्रम सुरू केले. 1950 पासून, भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर ख-या अर्थाने आपला देश प्रजासत्ताक झाला. महाविद्यालयीन युवकांनी भारतीय स्वातंत्र्यलढयाचा इतिहास व संविधानाचे महत्त्व समजून घेऊन याबाबत जनजागृती केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

 

प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात ‘हर घर तिरंगा’या उपक्रमाची माहिती देवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी संस्था व महाविद्यालयाच्या वतीने राबवित असलेल्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. 

दिनांक १३ ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तसेच स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांची माहिती असणा-या भिंतीपत्रकाचे विमोचन संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री. रविंद्रकुमार मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. राहूल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, डॉ. विष्णू जायभाये व डॉ. महेश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले तर तांत्रिक सहायक म्हणून डॉ. सुरज बुलाखे व डॉ. दगडू जगताप यांनी काम पाहिले.

कार्यक्रमास सर्व स्वयंसेवक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. महेश कुलकर्णी यांनी तर आभार डॉ. शामराव वाघमारे यांनी मानले. 

Related Posts

Leave a Comment