Home सामाजिक कुटगिरी गावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ता एकनाथ डिंगणकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

कुटगिरी गावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ता एकनाथ डिंगणकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Spread the love

कुटगिरी गावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ता एकनाथ डिंगणकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित



(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई – दिपक कारकर )


 

गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावी एका सर्वसामान्य कुटूंबात जन्मलेले एकनाथ धर्मा डिंगणकर हे नाव आज सामाजिक पटलावर सर्वश्रुत आहे.विविध संस्थेत कार्यरत व प्रत्येकाच्या सुख – दुःखात सतत सहकार्य आणि मदतीची तयारी हे त्यांच्या स्वभावाचे खरे वैशिष्ट्य आहे.कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई संलग्न कुणबी युवा विरार शाखेचे सचिव पद,सदर संस्थेच्या विस्तार – वाढीसाठी व तरुणांना एकजूट करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे हे व्यक्तिमत्व अनेकांना प्रिय आहे.वाडी- गाव – तालुका पातळीवर कला/क्रिडा/सामाजिक/शैक्षणिक/सांस्कृतिक/आरोग्य क्षेत्राशी निगडित उपक्रमात त्यांचे योगदान कायमच असते.

कौटुंबिक उदरनिर्वाह करिता गेली अनेक वर्षे ते एल.आय.सी. विमा सल्लागार म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहेत. ह्यातून सामाजिक दायित्व जपण्याचा त्यांचा स्वभावीक गुण आहे. आपल्या संपर्कातून मित्र – परिवार यांचा मोठा गोतावळा त्यांनी निर्माण केला आहे. अशा प्रेमळ,मनमिळावू स्वभाव कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला “पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था ( कार्यक्षेत्र भारत )” उपरोक्त संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय “आदर्श विमा सल्लागार पुरस्कार – २०२४” ने सन्मानित केले.

नुकतेच ह्या सोहळ्याचे वितरण रविवार दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजी,न्यू आयडियल स्कुल आणि ज्युनियर कॉलेज,वासिंद,( प.) ता. शहापूर,जि ठाणे येथील सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पकरंडक, सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते/शाहीर एकनाथ डिंगणकर यांचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

Related Posts

Leave a Comment