पवईत आयुष्य फाऊंडेशन तर्फे स्वतंत्र दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ प्रतीक कांबळे- मुंबई)
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान बघायला गेलात तर रक्ताचा पुरवठ्यासाठी ठिकठिकाणी बऱ्याचदा संघटनेच्या वतीने किंवा राजकीय पक्षांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे बघायला गेले तर समाजसेवेसाठी अग्रेसर असलेली पवईतील तरुणांची संघटना आयुष्य फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षी स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते यंदा देखील त्यांनी चौथ्या वर्षी सालाबादप्रमाणे रविवारी १८ ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन विश्र्वशांती बुद्ध विहाराच्या प्रांगणात करण्यात आले होते.
आयुष्य फाऊंडेशन यांना रक्त पेढी म्हणून बाळासाहेब ठाकरे ट्रोमा सेंटर यांची रक्तपेढी लाभली सकाळी ९ ते सायं ६ वाजेपर्यंत एकुण १५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न करण्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.