सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाबरोबच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम एन. एस. एस. मार्फत केले जाते– डॉ. शामराव वाघमारे
(दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड)
मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानिमित्ताने विद्याथ्र्यांना उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे लाभले होते. यावेळी डॉ. विष्णू जायभाये, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. महेश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. यानंतर प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे यांनी सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाबरोबच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत केले जाते. स्वतःचे व्यक्तिमत्व घडवत समाजसेवेची संधी यातून विद्याथ्र्यांना मिळत असते, पण त्यासाठी मेहनत करण्याची तयारी असावी लागते. तसेच राश्ट्रीय सेवा योजनेची कार्यपद्धती, उद्दिश्टे, प्रशासकीय संरचना, विभागामार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, घोषवाक्य व बोधचिन्ह तसेच वर्षाअखेरीस स्वयंसेवकांचे केले जाणारे मूल्यमापन आदींबाबत सविस्तर माहिती पी.पी. टी. च्या माध्यमातून त्यांनी विद्याथ्र्यांना सांगितली. तसेच गेल्या पाच वर्षात या विभागामार्फत राबविले गेलेले विविध उपक्रम आदींबाबत माहिती दिली.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. राहूल जाधव म्हणाले की, एन. एस. एस. विभागामध्ये भाग घेतलेल्या व सक्रिय कार्य करणा-या सर्वच स्वयंसेवकांना आपल्या सर्वांगीण विकासाची संधी मिळते. आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना एक व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाते. या संधीचा सर्व सहभागी विद्याथ्र्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास सर्व स्वयंसेवक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. ऋणाली सागवेकर हिने तर आभार कु. मिनाक्षी लोखंडे हिने मानले.