पॅराडाईज स्कूलचा समीर बनपुकर याचा प्रधानमंत्री यांच्याशी विविध विषयांवर संवाद
गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
(दिशा महाराष्ट्राची/ गडचिरोली)
केंद्रशासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने प्रेरणा उत्सव अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल आरमोरी येथील दहावी चा विद्यार्थी समीर मनोज बनपुरकर जिल्ह्यातून प्रथम आला होता. त्यानंतर त्याचे दिल्ली व वडनगर या ठिकाणी प्रशिक्षण देखील पार पडले.
या विद्यार्थ्याला दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होणाऱ्या देशाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले व १६ व १७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे पुन्हा प्रेरणा उपक्रमाचे प्रशिक्षण पार पडणार आहे. तत्पूर्वी १५ ऑगस्ट रोजी देशाच्या ७८ वा स्वातंत्र्य दिन भारतभर साजरा झालेल्या प्रमुख सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पार पडला. या कार्यक्रमात समीर सहभागी झाला होता. तसेच १६ ऑगस्टला झालेल्या संवाद सत्रात भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याकरिता गडचिरोली जिल्ह्यातून समीर बनपुरकर याला संधी प्राप्त झाली असून या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधून उत्कृष्ट प्रेरणा प्राप्त करण्याची संधी मिळाली. विविध विषयांवर प्रधानमंत्री यांच्याशी चर्चा समीरने केली.
समीरला ही संधी मिळाल्याबद्दल समीरचे व त्यांचे आई- वडिलांचे संस्थेचे अध्यक्ष गोविंदराजन कवंडर, विभाग प्रमुख विजयालक्ष्मी कवंडर, मुख्याध्यापक केशवन कवंडर, सुजाता मेहर, उपमुख्याध्यापिका किरण डाखोरे, नीतूराणी मालाकर व समस्त शिक्षक वृंद यांनी अभिनंदनचा वर्षाव केले असून समीरने आरमोरी तालुक्याचा व गडचिरोली जिल्ह्याचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.