शासकीय रुग्णालय सोलापूर येथे “तालुकास्तरीय तंबाखू मुक्त शाळा” कार्यशाळा संपन्न
दिशा महाराष्ट्राची/ सोलापूर
सलाम मुंबई फाऊंडेशन, शिक्षण विभाग व शासकीय रुग्णालय सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय कार्यशाळा शासकीय रुग्णालय सोलापूर येथे संपन्न झाली. सदर कार्यशाळेत प्रत्येक तालुक्यातील ५ शिक्षकांनी सहभाग घेतला.
या तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न शाळा कार्यक्रम कार्यशाळेचे उद्घाटन जिल्ह्याचे मा. कादर शेख शिक्षणाधिकारी, मा. विस्तार अधिकारी रतीलाल भुसे केंद्र प्रमुख मा. वाघमोडे सर, सलाम मुंबई फाऊंडेशन प्रतिनिधी संजय ठाणगे यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावर्षी जिल्ह्यातील सर्व शाळा व शासकीय व निमशासकीय कार्यालये तंबाखू मुक्त करण्याचा संकल्प केला. शाळेपासूनच विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर केले तर, भविष्यातील पिढी व्यसनमुक्त होईल. यासाठी प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम राबविण्यात सातत्य राखावे.
जिल्ह्यातील अनेक शाळा तंबाखू मुक्त झाल्या. ज्या शाळा तंबाखू मुक्त नाही. त्यांना या सत्रात तंबाखू मुक्त करून तंबाखू मुक्त केंद्र, तालुका व जिल्हा करु या यासाठी विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरित करावे असे आवाहन मा. कादर शेख शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपचंद सोयाम यांनी व्यसनापासून होणारे शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यसनापासून दूर राहून. आपला विकास कसा साधवा.विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी करावयाचे मार्गदर्शन याबद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, कार्यशाळेचे उद्देश व तालुकास्तरीय कार्यशाळेचे नियोजन याविषयी सलाम मुंबई फाऊंडेशन प्रतिनिधी संजय ठाणगे यांनी सविस्तर माहिती सांगितली. सूत्रसंचालन डॉ. शैलेश मा. विस्तार अधिकारी रतीलाल भुसे व आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख मा. वाघमोडे सर यांनी प्रयत्न केले.