Home शैक्षणिक मुंडे महाविद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

मुंडे महाविद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Spread the love

मुंडे महाविद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 



दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड :-

मंडगणड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यदिन व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर होते. यावेळी डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. धनपाल कांबळे, डॉ. महेश कुलकर्णी, प्रा. अशोक कंठाळे, श्री. युवराज बागडे, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर व श्री. युवराज बगाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विष्णू जायभाये यांनी उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकेत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. 

यावेळी बोलताना उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांचे कार्य देशाला प्रेरणा देणारे होते. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन अनेक भारतीयांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले.तसेच अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सामान्य व वंचित समाजाला वाचा फोडली. कामगार चळवळीतील त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. 

कार्यक्रमास सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी डॉ. विष्णू जायभाये यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

Related Posts

Leave a Comment