Home ताज्या बातम्या स्थानिक उत्खननातून मिळालेल्या जांभा दगडाची परजिल्ह्यात विक्री

स्थानिक उत्खननातून मिळालेल्या जांभा दगडाची परजिल्ह्यात विक्री

मनसे गुहागरच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

Spread the love

स्थानिक उत्खननातून मिळालेल्या जांभा दगडाची परजिल्ह्यात विक्री – मनसे गुहागरच्या वतीने तहसीलदारांना निवेदन



(दिशा महाराष्ट्राची/ उदय दणदणे- गुहागर)


 

गुहागर तालुक्यातील स्थानिक दगडाच्या खाणीतील उत्खननातून मिळालेल्या जांभा दगडाची सतत परजिल्ह्यात वाहतूक व विक्री होत असून या विक्री व वाहतुकीला महसूल विभागाची परवानगी आहे का? तसेच पर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी होते का? असे प्रश्न उपस्थित करत या संदर्भातील निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागरच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, गुहागर तालुक्यातून गेले अनेक महिने जांभा दगडाची पर जिल्ह्यात वाहतूक होत असून या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपणास निदर्शनात आणू इच्छितो की, गुहागर तालुक्यात उत्खनन होणारा जांभा दगड चिरा हा कर्नाटक अलिबाग, पठारी प्रदेशात विकला जातो,त्यासाठी संबंधित खात्याची परवानगी आहे का तसेच तो चिरा त्या ठिकाणी टाकून येणाऱ्या रिकाम्या गाड्यांची तपासणी होते का सबब की सध्या चिपळूण तालुक्यात उभळे येथे एक घडना घडली की चिरेखाणी मध्ये स्फोटक पदार्थ टाकलेले आढळून आलेले आहेत, तसेच काही वर्षांपूर्वी गुहागर तालुक्यात हे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या, अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी परं जिल्ह्यातून येणाऱ्या वाहतूकीची तपासणी करून त्यांना तालुक्याच्या हद्दीत प्रवेश द्यावा जेणेकरून पुढील अनर्थ टळेल व ते आपणच करू शकता, अशी सहकार्याची आणि योग्य कारवाईची अपेक्षा शेवटी व्यक्त करण्यात आले आहे.

सदर निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर , गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, महाराष्ट्र सैनिक प्रशांत साटले उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment