Home आरोग्य महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे २१ जून २०२४ रोजी १० वा आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात संपन्न

महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे २१ जून २०२४ रोजी १० वा आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात संपन्न

Spread the love

महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे २१ जून २०२४ रोजी १० वा आंतरराष्ट्रीय योगदिवस उत्साहात संपन्न

 



(दिशा महाराष्ट्राची/ उदय दणदणे- मुंबई)


 

महाराष्ट्र योगशिक्षक संघ (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने संपूर्ण देशात योग साधने बाबत जनजागृती सोबतच समाजाला सदृढ ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील योग शिक्षक हा अहोरात्र झटत आहे, म्हणूनच सलाबाद प्रमाणे महाराष्ट्र योगशिक्षक संघचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांच्या आदेशवरून शुक्रवार दिनांक २१ जून २०२४ रोजी, महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्ह्यातर्फे दिनांक २१ जून रोजी १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

     या वेळी घाटकोपर असल्फा येथील हिमालया सोसायटी परिसरातील बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहात योगशिक्षिका साक्षी कलगुटकर यांनी योगशिबिर घेतले, या उपक्रमात असल्फा घाटकोपर येथील स्थायिक नगरसेवक किरणभाऊ लांडगे तसेच अनिता लांडगे व महिला शाखाप्रमुख राजश्री चव्हाण आणि प्रमुख अतिथी डॉ कल्पना जैस्वाल यांच्या हस्ते श्री ऋषीमुनी पतंजली यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून योग शिबिराला सुरुवात करण्यात आले.

मुंबई जिल्हा अध्यक्ष योगशिक्षक संतोष खरटमोल, उपाध्यक्षा साक्षी कलगुटकर, मीडिया प्रभारी प्रशांत मकेसर, सदस्या लक्ष्मी शर्मा, रेश्मा धुरी पाटील, ईश्वरी शिंदे, संपदा लातूरे यांनी उपस्थित साधकांकडून सूक्ष्म व्यायाम, योगआसने, प्राणायाम, सूर्यनमस्कार प्रकार करून घेतले. तसेच मुंबई जिल्ह्याच्या कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर आणि सचिव अमित चिबडे यांनी अमित रिद्धी योगशाला मार्फत एवरशाईन नगर, मालाड पूर्व येथे, कार्यालय सचिव दिलीप घाडगे, सदस्य राजश्री मोरे हे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मिठागर रोड, महाराष्ट्र मंडळ मुलुंड येथे, सदस्या रेखा भिंगार्डे , रश्मी सावर्डेकर ,मनुजा चव्हाण, फाल्गुनी संघराजका, हिरा गणवीर, सविता कदम, संजीवनी शेटे हे मुलुंड पुर्व आणि पश्चिम येथे, उपाध्यक्षा प्रियांका ढोले दादर येथे, महिला प्रकोष्ठ प्रभारी डॉ. पौर्णिमा काळे वरळी येथे, सचिव सुषमा माने मीरा रोड येथे, उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई आणि सोशल मीडिया प्रभारी निलेश मारुती साबळे हे बोरिवली येथे, सदस्या प्रियांका भोसले हे दहिसर येथे तर सदस्या अर्निका बांदेलकर ह्या घाटकोपर येथे, अशा सर्व योगशिक्षकांच्या मार्फत व मुंबई मधून महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या मुंबई जिल्हा टीमकडून मुंबईभर हा योगदिवस आनंदात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

२१ जून २०२४ आंतरराष्ट्रीय योगदिवसा निमित्त संपूर्ण मुंबईमधून विद्यार्थी तसेच त्यांचे पालकगण, आणि योगसाधक व उपस्थित रहिवाश्यांना या उपक्रमात सामावून घेतल्याबद्दल सर्व योगविर व योगवीरांगणा यांचे मुंबई जिल्हाअध्यक्ष संतोष महादेव खरटमोल यांनी मनापासून आभार व्यक्त केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Posts

Leave a Comment