ढोर चांभार स्त्रियांच्या जाणिवांचा आंबेडकरी परीघ – डॉ.सुनिता सावरकर
अभिप्राय- अर्चना उके चव्हाण, नागपूर
दिशा महाराष्ट्राची – नागपूर
आमच्या लेखणीला बळ ज्यांच्या मुळे मिळाले त्या महामानवांना त्रिवार अभिवादन …!
आद. लेखिका डॉ.सुनिता सावरकर मॅडम यांनी डॉ.आंबेडकर पूर्व कालखंडातील अस्पृश्य स्त्रीया व त्यांचे विविध क्षेत्रातील आघाडीवर असलेले कार्य, त्यांच्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास म्हणजेच अस्पृश्य स्त्रीयांचे चळवळीला योगदान …
या कर्तृत्वाचा संशोधनात्मक अभ्यास करुन एक परीघ या छोट्याशा ब्लर्ब मधून शोध पुस्तकाच्या स्वरुपात आमच्या भेटीस आणले आहे. आंबेडकर पूर्व कालखंडातील अस्पृश्य स्त्रीयांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्याची मुहूर्तमेढ रोवली.
ढोर चांभार समाजातील स्त्रीयांच्या जाणिवांचा आंबेडकरी परीघ या मॅडमच्या संशोधनात्मक शोध पुस्तकाला मानाचा मुजरा …..!
आंबेडकरी वर्तुळाचे परिघ म्हणजे अनेक कर्तबगार स्त्रीया होत. स्त्रीयांच्या जाणिवांचा आक्रोश व निर्णय घेण्याची क्षमता शिक्षण या सुरक्षा कवचाने साध्य झाले आहे. म्हणजेच स्त्रीया तेव्हाही लढवय्या होत्या आणि आजही आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ..
कादंबरीचे मुखपृष्ठ ध्यानात घेता स्पष्ट होते की,अस्पृश्य स्त्रीया त्यांच्या हक्कासाठी सत्याच्या मार्गाने लढणाऱ्या होत्या. म्हणजे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे त्यांना ज्ञात झाले असावे आणि हे प्राषण करणे अनिवार्य आहे, काळाची गरज आहे हा केलेला निश्चय हे बोलके चित्र शोध पुस्तकाचे मुखपृष्ठ सांगून जाते.
कधी तरी अस्पृश्यांचा कैवारी जन्म घेणार हे कदाचित निश्चित होते. ….आणि समाजाची कायापालट होणार. …
गुलाबाला तेव्हाही सुगंध होता आणि आजही सुगंध आहे. तेव्हाही सुगंध दरवळला आणि आजही दरवळतो आहे. परंतु हा दरवळणारा सुगंध अती अल्प लोकांपर्यंत पोहचला आणि ज्यांच्या पर्यंत पोहचला त्या स्त्रीया प्रामुख्याने स्वतः शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय होत्या.
त्यांनी शिक्षणाच्या गोडव्याने आपल्या समाजातील लोकांचे विशेषतः ढोर चांभार समाजातील स्त्रीयांच्या जीवनात गोडवा निर्माण केला.
दलित बंधू या मासिकात लेखिका कु. शांता राजभोज यांनी १९५१ ला बौद्ध धर्म हा मानवी धर्माची संजिवनी आहे असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. स्त्रीची ओळख म्हणजे अनंतकाळची आई. ….स्त्रीया नेहमी दु:खाशी दोन हात करायला तयार असतात. .. दिपा प्रमाणे तेवत असतात .
हजारो वर्षाच्या विषमतेच्या प्रहारा सोबत जोहार मायबाप म्हणत काठीला घुंगरू बांधून हिंडत असू … तेव्हा महूच्या मातीत लख्ख विजेचा कडकडाट झाला व विषमतेचा नायनाट करण्यासाठी तेजपुंज भारत भू वर अवतरले आणि जन्म झाला प्रज्ञासूर्याचा…
अगदी बाल मनापासून बाबासाहेब आपल्या अंतर्मनात विषमतेचे व्रण सोसतच मोठे झाले. ब्रिटन अमेरिका सारख्या लोकशाही प्रधान देशातून शैक्षणिक, सामाजिक जीवन पारखून आमच्या साठी न्याय, हक्क खिशात घेऊन आले.
वर्णव्यवस्थेच्या उतरंडीवर प्रहार करण्याचे मनोमन ठरवले.दिशा मिळाली व मुक्तिसंग्रामाला प्रारंभ झाला. मुक्यांना वाचा फुटली ,प्रतिभावंतांच्या प्रतिभेला आभा मिळाली. आणि चर्चा सत्रे,परिषदे सुरु झाली. आपल्या उद्धारकर्त्याची कवने कवी, गायक, कलावंत गाऊ लागली.
कातरवेळी सूर्याने तांबूस पिवळसर वस्त्र परिधान करून जगाला करुणा शिकवणाऱ्या उगवतीच्या सूर्या बरोबर करुणामय तथागत भगवान बुद्धाच्या मध्यममार्गाची शिकवण मिळाली व धम्म दिसला.
निरंजना नदी,महात्मा फुलेंचा हौद, महाडचे चवदार तळे व त्यातून उदयास आले,खळखळले करुणेचे महासागर. …
निळ्याशार ज्ञान अंबरी मिलींद नागसेन बोलू लागले….
आमच्या बापाच्या ज्ञानाची फुले फुलवू लागले….
अर्चना उके चव्हाण, नागपूर.
८६२४०६२०१२
समुह प्रशासिका
रमाई साहित्यिक विचारमंच नागपूर महाराष्ट्र. …..!!!!