Home सामाजिक शून्यातून विश्व निर्माण करणारा समाजशील नेतृत्व हरपलं – विश्वास गोंधळी काळाच्या पडद्याआड

शून्यातून विश्व निर्माण करणारा समाजशील नेतृत्व हरपलं – विश्वास गोंधळी काळाच्या पडद्याआड

Spread the love

शून्यातून विश्व निर्माण करणारा समाजशील नेतृत्व हरपलं – विश्वास गोंधळी काळाच्या पडद्याआड

 


(दिशा महाराष्ट्राची – उदय दणदणे)

 

गुहागर तालुक्यातील नावाजलेले व्यावसायिक, कुणबीवाडी विकास मंडळ असोरे(रजि) मंडळाचे विद्यमान स्थनिक सचिव, ग्रामपंचायत सदस्य, माजी शिवसेना शाखाप्रमुख, मौजे असोरे गावचे कार्यक्षम, अभ्यासू, उच्चशिक्षित तसेच अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडणारे, हरहुन्नरी, स्मितभाषी, सुसंस्कृत असं लोकप्रिय व्यक्तिमत्व श्री. विश्वास गोपाळ गोंधळी यांचे गुरूवार दिनांक ०६ जून २०२४ रोजी सायंकाळी ०६ वा.  हृदयविकाराच्या तीव्र धक्याने वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी अकाली दुःखद निधन झाले.

कै. विश्वास गोंधळी हे व्यावसायाने खाणमालक होते. उच्चशिक्षित असूनही नोकरी न करता व्यावसायिक होण्याच्या उद्देश्याने ते असोरे येथे कायम स्थायिक झाले. वडापची गाडी ते खाणमालक असा शून्यातून विश्व निर्माण करणारा त्यांचा प्रवास थक्क करणारा, अनेकांना प्रेरणादायी ठरत होता, मौजे असोरे गावातील आवरे-असोरे ग्रामपंचायतीचे ते अनेक वर्षे सदस्य होते. शासकीय कामात पारंगत, गावाचे प्रमुख आधारस्तंभ होते. गावातील सामाजिक, गावविकासाच्या कामात तसेच प्रत्येकाच्या कठीण प्रसंगी तसेच विविध सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रस्थानी असायचे,असोरे पंचक्रोशीत तसेच तालुका स्तरावर त्यांचा नावलौकिक, आदर्श व्यक्तिमत्त्व अशी ओळख होती.

त्यांच्या अकाली निधनाने मौजे असोरे गावाची जबाबदारी एक हाती पेलणाऱ्या एका सक्षम अशा नेतृत्वाला असोरे गाव मुकला असून त्यांच्या अचानक जाण्याने गावाची फार मोठी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. शुक्रवार, दिनांक ०७ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता मौजे असोरे येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या अंत्यसंस्काराला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता

त्यांच्या पश्चात त्यांची सुविद्य पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे.
“शून्यामधूनी विश्व निर्मूनी,कीर्ती सुगंध वृक्ष फुलवूनी,लोभ माया प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी, अमर जाहला तुम्ही जीवनी”! अनेकांना प्रेरणादायी ठरणारं व्यक्तीमत्व स्वर्गीय विश्वास गोंधळी यांना शोकाकुल वातावरणात सर्वस्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

“अत्यंत दुःखद, वेदनादायी घटना. प्रचंड मेहनती, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या अकाली जाण्याने मौजे असोरे गावाचे व पंचक्रोशीचे कधीच भरून न निघणारे नुकसान झाले आहे.आम्ही एक विश्वासू सहकारी गमावला.”- श्री.दिलीप पांडुरंग बादावटे (अध्यक्ष) कुणबीवाडी विकास मंडळ- असोरे

“ज्यांच्यावर संपूर्ण गाव सोपवून आम्ही कार्यकर्ते मंडळी मुंबईत निर्धास्त राहत होतो, असा आमच्यातील जिवलग सहकारी, मौजे असोरे गावाचा आधारस्तंभ हरपला!- श्री.दिपक वेलुंडे (सचिव) कुणबीवाडी विकास मंडळ -असोरे

Related Posts

Leave a Comment