Home सांस्कृतिक नमन लोककला संस्था राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

नमन लोककला संस्था राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

कन्याकुमारी नगरीत रंगला पुरस्कार प्रदान सोहळा

Spread the love

नमन लोककला संस्था राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

      कन्याकुमारी नगरीत रंगला पुरस्कार प्रदान सोहळा


दिशा महाराष्ट्राची / उदय दणदणे

मुंबई :- कोकणची समृद्ध लोककला “नमन लोककला” त्याच बरोबर कोकणच्या मातीत रुजलेल्या लोककलांचा सन्मान युवा प्रणेते स्वामी विवेकानंद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कन्याकुमारी नगरीत झाला. नमन लोककला व लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढणारी आणि अल्पावधीत नावारूपाला आलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था अर्थात नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र अखंड- भारत) या संस्थेने नमन लोककला व लोककलावंतांना शासन दरबारी चालवलेला लढा, कोकणच्या दुर्लक्षित लोककलावंतांना पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवरती मारलेली कौतुकाची थाप,त्याचबरोबर लोककलावंतांमध्ये निर्माण केलेला आशावाद, या सगळ्याचे फलित म्हणून नमन लोककला संस्थेला “हुतात्मा अपंग बहूउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था” योगलेवाडी-कराड (महाराष्ट्र) वतीने राष्ट्रीय स्तरावर” युवा प्रणेते स्वामी विवेकानंद राष्ट्रीय “कलारत्न”पुरस्कार-२०२४ देऊन गौरवण्यात आले.

हा सन्मान सोहळा रविवार दिनांक २६ मे रोजी कन्याकुमारी नगरीत (तामिळनाडू) येथे मा.अंगिराज (मामाजी) कर्नाटका-व्यवस्थापक स्वामी विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी), मा.सुनीलकुमार-जनरल मॅनेजर, स्वामी विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) अशा प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सदर पुरस्कार प्रदान सोहळ्याला नमन लोककला संस्थेचे प्रतिनिधी महासचीव शाहिद खेरटकर, सचिव सुधाकर मास्कर,सदस्य/प्रसिद्धी प्रमुख उदय दणदणे उपस्थित राहत संस्थेच्या वतीने हा सन्मान स्वीकारण्यात आला.

Related Posts

Leave a Comment