कलगी तुरा समाज उन्नती मंडळ- मुंबई संस्थेला राष्ट्रीय स्तरावर “कलारत्न” पुरस्कार प्रदान
दिशा महाराष्ट्राची/ उदय दणदणे
मुंबई:- कोकणातील कलगी-तुरा लोककलेचं जतन, संवर्धन व कलाकारांच्या उन्नतीसाठी कार्यरत असणारी, गेली सहा दशक जवळ जवळ ६० वर्षे गौरवशाली वाटचाल करणारी महाराष्ट्रातील कलगी तुरा परंपरेतील अग्रगण्य संस्था “कलगी तुरा समाज उन्नती मंडळ (मुबंई) ह्या संस्थेला उल्लेखनीय कार्यसेवेबद्दल राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाला असून स्वामी विवेकानंद यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कन्याकुमारी नगरीत (तामिळनाडू )येथे, रविवार दिनांक २६ मे २०२४ रोजी “हुतात्मा अपंग बहूउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था” योगलेवाडी-कराड (महाराष्ट्र ) वतीने मा.अंगिराज (मामाजी)कर्नाटका,व्यवस्थापक-स्वामी विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) मा.सुनीलकुमार ,जनरल मॅनेजर-स्वामी विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी)यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभहस्ते,युवा प्रेरणेते स्वामी विवेकानंद राष्ट्रीय “कलारत्न” पुरस्कार-२०२४ देऊन गौरविण्यात आले.
“कलगी तुरा समाज उन्नती मंडळ- मुंबई संस्थेचे पदाधिकारी, अनंत तांबे-अध्यक्ष, संतोष धारशे-सचीव, चंद्रकांत गोताड-माजी अध्यक्ष, सुधाकर मास्कर -उप-सचीव उपस्थितीत राहत संस्थेच्या वतीने सदर पुरस्कार स्वीकारण्यात आला.