Home शैक्षणिक कर्मवीर इदाते कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी वाणिज्य शाखेचा 100 टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल 98.36 टक्के

कर्मवीर इदाते कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी वाणिज्य शाखेचा 100 टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल 98.36 टक्के

मंडणगड तालुक्यात मैथिली भोपणे वाणिज्य व प्रज्वल जाधव विज्ञान शाखेतून प्रथम

Spread the love

कर्मवीर इदाते कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी वाणिज्य शाखेचा 100 टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल 98.36 टक्के

मंडणगड तालुक्यात मैथिली भोपणे वाणिज्य व प्रज्वल जाधव विज्ञान शाखेतून प्रथम


 

(दिशा महाराष्ट्राची / मंडणगड)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी – 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी वाणिज्य व विज्ञान परीक्षेमध्ये येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील प्रविष्ठ नियमित विद्यार्थ्यांच्या वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के तर विज्ञान शाखेचा 98.36 टक्के लागला आहे.

यामध्ये इयत्ता 12 वी वाणिज्य शाखेतून कु. भोपणे मैथिली अनंत हिने 85.00 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला तसेच व्दितीय क्रमांक कु. हसबुले सरिन फैज 74.33 टक्के, कु. कदम किर्ती संजय हिने 73.67 टक्के गुण मिळवून तृतीय येण्याचा मान मिळविला. तर विज्ञान शाखेतून जाधव प्रज्वल दिनेशकुमार याने 79.83 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला. व्दितीय क्रमांक घाणेकर शिवम सुनिल 65.00 टक्के तर कु. रहाटवीलकर वफा सलाम हिने 62.50 टक्के गुण मिळवून तृतीय येण्याचा मान मिळविला.यामध्ये वाणिज्य विभागातून कु. मैथिली भोपणे व विज्ञान विभागातून प्रज्वल जाधव यांनी मंडणगड तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. सर्व यशस्वी विध्यार्थाचे मंडणगड परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयामधून वाणिज्य शाखेतून एकूण 88 नियमित विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी विशेष प्राविण्य 01, प्रथम श्रेणीमध्ये 11, व्दितीय श्रेणीमध्ये 60 विद्यार्थी, तृतीय श्रेणीमध्ये 16 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर विज्ञान शाखेतून एकूण 61 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी विशेष प्राविण्य 01 , प्रथम श्रेणीमध्ये 02 विद्यार्थी, व्दितीय श्रेणीमध्ये 37 विद्यार्थी तर तृतीय श्रेणीमध्ये 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते, अध्यक्षा सौ. संपदाताई पारकर, कार्याध्यक्ष श्रीराम इदाते, कार्यवाह प्रा. सतिश शेठ तसेच सर्व संस्थापदाधिकारी, स्थानिक संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. राहूल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Posts

Leave a Comment