UHRC भारतच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णताई कदम यांच्या सतर्कतेमुळे हरवलेले बाळ सुखरूप मिळाले
दिशा महाराष्ट्राची / ठाणे
दोन दिवसापूर्वी रात्री अकरा वाजता युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारतच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णताई कदम यांना अंगणवाडी सेविका श्रीमती सरिता शेळके यांचा फोन आला होता. त्यांच्या एरियामध्ये एक अडीच ते तीन वर्षाचा लहान मुलगा चुकून आल्याचे त्यांना दिसले होते. त्याला त्याचे नाव गाव काही सांगता येत नव्हते.
महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णाताई कदम यांनी त्वरित दिवा पोलीस चौकी मध्ये संपर्क साधून API श्री अमोल कोळेकर सरांना या गोष्टीची माहिती दिली असता समजले की पोलीस स्टेशनमध्ये या मुलाचे मिसिंग कम्प्लेंट दिली गेलेली आहे आणि त्याचे आई-वडील त्याला शोधत आहेत त्यानंतर त्या मुलाला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस ह. श्री रवींद्र देसले आणि श्री कारगोडे यांच्या सहकार्याने मुलाच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या या कार्याबद्दल त्याबद्दल सर्व पोलीस कर्मचारी आणि श्री अमोल कोळेकर सर यांचे सुवर्णा कदम यांनी आभार मानले.