‘स्टॅण्डर्ड गुलाम’ काव्य संग्रहास तिसरा संत तुकाराम काव्य पुरस्कार प्राप्त
(दिशा महाराष्ट्राची / नांदेड)
शिप्पूर तर्फ आजरा ता गडहिंग्लज कोल्हापूर येथील प्रसिद्ध साहित्यिक माजी प्राचार्य डॉ. सुरेश कुराडे यांच्या स्टॅण्डर्ड गुलाम या काव्यसंग्रहास दि. १० रोजी ७वे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात प्रतिष्ठेचा “संत तुकाराम काव्य पुरस्कार” प्राप्त झाला.
सदरचा पुरस्कार संमेलनाध्यक्ष जेष्ठ विद्रोही साहित्यिक मा. सुधाकर जोगळेकर, बेळगांव कर्नाटक यांचे हस्ते व स्वागताध्यक्ष मा. बालाजीराव सोनटक्के उदघाटक इंजि. डि टी शिंपडणे, विशेष अतिथी म. रा. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य मा. विलास शिंदगीकर, माजी संमेलनाध्यक्ष जेष्ठ कवी सुभाष सोनवणे, मा. पुरुषोत्तम बेर्डे मा. मुंढे सर नांदेड व अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक व साहित्यिक मा. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या उपस्थितीत मा. कवी सुरेश कुराडे याना प्रदान करण्यात आला.
स्टॅण्डर्ड गुलाम या काव्यसंग्रहास यापूर्वी रत्नसिंधू साहित्य कलामंच रत्नागिरी व कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी यांचा साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याच्या या पुरस्काराबद्दल चर्मकार विकास संस्था महाराष्ट्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र, कोकण मराठी साहित्य कविकट्टा व शिप्पूर ग्रामस्थ व कुराडे परिवारासह साहित्य संस्थामार्फत व साहित्यिक मित्रा तर्फ हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.