Home सामाजिक जागतिक महिला दिनानिमित्त दिवा येथे महिलांना शासकीय व प्रशासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त दिवा येथे महिलांना शासकीय व प्रशासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

Spread the love

जागतिक महिला दिनानिमित्त दिवा येथे महिलांना शासकीय व प्रशासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 


दिशा महाराष्ट्राची / ठाणे –

 

दिनांक 12 मार्च २०२४ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरंभ सोशल फाऊंडेशन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय ठाणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना शासकीय व प्रशासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम दिवा (पू) येथे आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमात सौ. रेखा राजेंद्र हिरे ( संरक्षण अधिकारी-ठाणे ), श्री. प्रशांत अभंग (वकील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे) तेजस्विनी पाटील (सखी सेंटर केन्द्र प्रमुख), अंजली हडवळे (समुपदेशक), श्रद्धा नारकर (चाईल्ड लाईन), आरंभ संस्था अध्यक्ष सुवर्णा कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ह्या सर्वांनी महिलांना त्यांच्या अधिकार व कायद्या विषयी आणि कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 व बाल संगोपन योजनेबाबत तसेच चाईल्ड लाईन, व सखी वन स्टॉप सेंटर विषयी उपस्थितांना मागदर्शन केले.

 

Related Posts

Leave a Comment