पुणे येवलेवाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण कार्यक्रम संपन्न
दिशा महाराष्ट्राची/ पुणे-
युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तरुण जी बाकोलीया, राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती सुमनजी मोरया, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णाताई कदम यांच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रमुख उपस्थितीत हवेली तालुका अध्यक्ष सौ. शोभनाताई पोटे यांनी पुण्यामध्ये येवलेवाडी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमास 30 ते 35 महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमास महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णाताई कदम यांना आमंत्रित केले होते. तसेच जनसेवा शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ शार्मिलाताई नलावडे याही उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात महिलांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षण आयोजित करण्यास संबंधित कार्यक्रम घेण्यात आला. त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या महिलांना खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. सर्व महिलांना शोभनाताई पोटे यांनी लवकरच वेगवेगळे प्रशिक्षण आयोजित करण्याचे आश्वासन दिले. अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. उपस्थित सर्व महिल आभार व्यक्त करण्यात आले.