डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी मुंबई तर्फे अभिवादन दिन साजरा
(दिशा महाराष्ट्राची / दिपेश मोहिते)
६ डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्रातून तमाम भीमसैनिक चैत्यभूमीवर बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी येतात. या सगळ्यात आपलं वेगळेपण टिकवून ठेवत, वर्षभर बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवत आणि बुद्ध विचार गतिशील ठेवणारी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संस्था ही कायम कार्यरत असते.
यावर्षीही अनेक समाजिक उपक्रम करत राष्ट्रनिर्माते महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी मुंबई (विभाग- देवरुख) स्थानिक/ मुंबई सन्माननीय पदाधिकारी मुंबई कमिटीचे विद्यमान अध्यक्ष अशोकजी जाधव तसेच स्थानिक कमिटीचे विद्यमान अध्यक्ष संजय मा. मोहिते, प्रमुख संघटक मान. संजय ह. कांबळे, सचिव धर्मपाल जाधव, सरचिटणीस सचिन सुरेश जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कमिटी मुंबई विभाग देवरुख यांच्या वतीने देवरुख येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यापुढील वर्षभर बाबासाहेबांच्या विचारांना सर्वदूर पोहचवण्यासाठी ही संस्था कार्यरत राहण्याचा मानस दृढ करत बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.