Home सामाजिक सम्यक बुद्ध विहार सांस्कृतिक केंद्र भडवळे तर्फे चैत्यभूमी येथे भीम अनुयायांसाठी अल्पोपहार वाटप

सम्यक बुद्ध विहार सांस्कृतिक केंद्र भडवळे तर्फे चैत्यभूमी येथे भीम अनुयायांसाठी अल्पोपहार वाटप

Spread the love

सम्यक बुद्ध विहार सांस्कृतिक केंद्र भडवळे तर्फे चैत्यभूमी येथे भीम अनुयायांसाठी अल्पोपहार वाटप

 


(दिशा महाराष्ट्राची / मुंबई)

 

सम्यक बुद्ध विहार सांस्कृतिक केंद्र भडवळे, पोस्ट वावघर, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजी रात्री चैत्य भूमी दादर या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या भीम अनुयायांना अल्पोपहार म्हणून बिस्कीट वाटप केले.

देशाच्या कानाकोऱ्यातून भीम अनुयायी दादर येथे चैत्यभूमी या ठिकाणी आपल्या मार्गदात्याला अभिवादन करण्यासाठी १,२ डिसेंबर पासून येत असतात. त्यांची कोणत्याच प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेपासून ते सर्व सामाजिक संस्था त्यांना सेवा देण्याचे काम करत असतात. त्याचप्रकारे हे एक संघटन.

सदर उपक्रम सम्यक बुद्ध विहार सांस्कृतिक केंद्राचे कार्यकारी मंडळ, मुंबई/ ग्रामीण भावकी, मुंबई/ ग्रामीण महिला मंडळ उपस्थित होते.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जाधव संस्थेचे अध्यक्ष प्रमोद जाधव संस्थेचे सचिव राजन पवार, संस्थेचे खजिनदार यांनी विशेष मेहनत घेतली. अल्पोपहार वाटपासाठी विलास जाधव, विजय जाधव, सचिन जाधव, राजेश जाधव, सुभाष जाधव, अरुण जाधव, शैलेश पवार, दीपक जाधव, रुपेश जाधव, प्रफुल्ल जाधव, संगम जाधव, राहुल जाधव, मानव जाधव, सुजाता जाधव, रश्मी पवार, संजना जाधव, विधी जाधव आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment