Home सामाजिक २२ प्रतिज्ञा सत्य विज्ञान सामाजिक फाउंडेशन तर्फे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन 

२२ प्रतिज्ञा सत्य विज्ञान सामाजिक फाउंडेशन तर्फे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन 

गंडे, दोरे कापून दिला अंधश्रद्धेला फाटा

Spread the love

२२ प्रतिज्ञा सत्य विज्ञान सामाजिक फाउंडेशन तर्फे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन 

 


गंडे, दोरे कापून दिला अंधश्रद्धेला फाटा


(दिशा महाराष्ट्राची / मुंबई प्रतिनिधी)

 

२२ प्रतिज्ञा सत्य विज्ञान सामाजिक फाउंडेशन तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी शिवाजी पार्क मैदान येथे २२ प्रतिज्ञा पत्रकाचे वाटप करून २२ प्रतिज्ञा प्रचार आणि प्रसार माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करण्यात आले. तसेच अभिवादन करायला आलेल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा समजाऊन सांगून त्यांच्या हातातले, गळ्यातले , पायातले गंडे दोरे, तविद, कडे कापून प्रबोधन करण्यात आले.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यावर आपल्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देताना २२ प्रतिज्ञा देखील दिल्या होत्या. त्यांचे स्मरण करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील पत्रके, बॅनर्सच्या माध्यमातून तरुणांनी २२ प्रतिज्ञांची माहिती भीम अनुयायांना देण्यात आली. तसेच त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगण्यात आले. त्यांच्या मेंदूतील अंधश्रद्धेचे गंडे ,दोरे कापण्याचे आले. घर, घर बुद्ध जयंती साजरी व्हावी आणि बुद्धांचे विचार प्रत्येकाच्या घराघरात रुजावे या करिता जनजागृती करण्यात आली.

‘२२ प्रतिज्ञा अभियान’ हा उपक्रम गेल्या १९ वर्षांपासून राबवत आहेत. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येकाच्या घराघरात पोहचवण्यासाठी डॉ. बासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे आचरण प्रत्येकाने केले पाहिजे. हातातील गंडे- दोरे कापून डॉ. बाबासाहेबांचे विचार सांगण्याचे काम व अंधश्रद्धा दूर करण्याचे काम २२ प्रतिज्ञा अभियान संपूर्ण टीम करीत आहे. या अभियानातून अंधश्रद्धा दूर होत असून, यातून समाजात परिवर्तन होताना दिसून येत आहे. व बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांना वैज्ञानिक दृष्ट्या सक्षम करणे , त्यांना जागृत करण्याचे काम “२२ प्रतिज्ञा अभियान ” करत आहे.

२२ प्रतिज्ञा अभियान क्रांती करत आहे. जाती, सोषन संपविण्याचे अभियान , विज्ञानमय करण्याचे अभियान आहे. अंधश्रद्धेपासून मुक्त करण्याची अभियान असे निवृत्त सह आयकर आयुक्त अरविंद सोनटक्के यांनी बोलतांना सांगितले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदिक्षा घेत असतांनी संपूर्ण बांधवांसाठी २२ प्रतिज्ञा दिलेल्या आहेत ज्याला बौद्धांच्या स्वतंत्राचा जाहीरनामा म्हणू शकतो. २२ प्रतिज्ञा प्रतिज्ञाच पालन करणारा बौद्ध व्यक्ती है पूर्णपणे बुद्धांच्या विचारावर आणि मार्गावर चालतो. असे यावेळी प्राध्यापक डॉ. संजय खोब्रागडे यांनी बोलताना सांगितले. आपण ज्या मुखातून जय भीम बोलतोय त्या मुखात गुटखा तंबाखू, दारू पिऊ नका कोणतेच व्यसन करू नका त्याने स्वतःची तसेच कुटुंबाची हानी होते, म्हणून तंबाखू गुटखा दारू सोडा २२ प्रतिज्ञाचे आचरण करा प्रचार प्रसार करा असे असे २२ प्रतिज्ञा अभियान महाराष्ट्र प्रमुख प्रदिप जाधव यांनी बोलतांना सांगितले

गंडे, दोरे कमी होत आहेत हे २२ प्रतिज्ञा अभियानाचे यश मानतो मी. या वर्षी शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांच्या हातात, पुस्तकं, फोटो, पुतळे,मुर्त्या असं सर्व होत. परंतु महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या नागरिकांच्या हातात गंडे दोरे मोठ्याप्रमाणावर दिसून येत होते. असे २२ प्रतिज्ञा अभियान प्रचारक विनोद पवार यांनी बोलतांना सांगितले. तुम्ही सुद्धा या अभियानाचे प्रचारक बनू शकता प्रचारक बनण्यासाठी २२ प्रतिज्ञा अभियानाचे प्रचारक बनण्यासाठी महाराष्ट्र प्रमुख प्रदिप जाधव 7208777050 यांच्याशी संपर्क साधू शकता.

Related Posts

Leave a Comment