Home शैक्षणिक ३ रे अक्षर मानव शिक्षण संमेलन नांदेड येथे उत्साहात संपन्न

३ रे अक्षर मानव शिक्षण संमेलन नांदेड येथे उत्साहात संपन्न

Spread the love

३ रे अक्षर मानव शिक्षण संमेलन नांदेड येथे उत्साहात संपन्न

 


(दिशा महाराष्ट्राची / दिपेश मोहिते)

 

शिक्षण हा जगण्यातला अविभाज्य घटक आहे. शिक्षण अभ्रष्ट साधनांसह प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचले पाहिजे. शिक्षणाचा हा शुद्ध प्रवाह पोहचवण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अडचणी, समस्या, त्यांचं माणुसपण हे सगळं जपत शिक्षण व्यवस्था आणखी कशी बळकट आणि सक्षम करता येईल यासाठी “अक्षर मानव शिक्षण संमेलन” आपण दरवर्षी घेत असतो. दिनांक 24, 25 आणि 26 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जनजागृती विद्यालय, लिंगन केरूर ता. देगलूर जि. नांदेड येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.

महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी, लेखक, विद्यार्थी, आरोग्य क्षेत्रातील मंडळी तसेच शिक्षण प्रेमींनी यात सहभाग घेतला होता. एकूण 9 सत्रांच्या या संमेलनात देशोदेशीच्या शिक्षण पद्धती, मोफत शिक्षण, शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण, देशातले शिक्षणातले अभिनव प्रयोग, भेदरहित आणि दैवीकरणापासून वेगळया शाळा, गरिबी आणि संमेलन यांची सांगड, शिक्षण आणि संस्कार, पुस्तकी ज्ञान आणि कौशल्य शिक्षण, शिक्षकांची आवांतर कामे आणि कौटुंबिक सुख, अध्यावत शिक्षक, मुलांची लैंगिकता आणि शिक्षण या आणि अशा अनेक विषयावर तोडग्यासह चर्चा, गप्पा आणि विचारविनिमय या संमेलनात झाला.

प्रसिद्ध लेखक, विचारवंत राजन खान यांच्या मार्गदर्शनाखाली या संमेलनाच्या सर्व विषयांची उकल करण्यात आली. याच बरोबर शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे राबणाऱ्या व्यक्तींचा कृतज्ञता सन्मान सोहळा ही संपन्न झाला. मा. श. लं. नाईक,मा.व्यंकटेश चौधरी, मा. श्री. महेश मोरे, मा. पांडुरंग पुठ्ठेवाड, मा. प्रा. डॉ. रवींद्र बेम्बरे, मा. प्रा. डॉ. दीपक चिद्दरवार, मा. प्रतिक्षा तालंगकर- कथले, मा. गोपाळ तुळशीराम नाईक, मा. वर्षा गोपाळ नाईक, मा. मनीषा घेवडे, मुंबई, मा. धनंजय गुडसुरकर, उदगीर यांना कृतज्ञता सन्मान आदरणीय राजन खान यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच अक्षर मानव मातोश्री सौ. स्नेहप्रभा भास्करराव तौर बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार समर्थ फुड्स प्रॉडक्ट्स उत्पादन औरंगाबाद यांच्या सहकार्याने लेखक सुरेश सांवत, सुरेश वांदिले (मुंबई), नियतकालिक पुरस्कार- ‌मनशक्ती बालकुमार दिवाळी अंक (लोनावळा, पुणे) संपादक डॉ. वर्षा तोडमल, कार्यकारी संपादक श्री. दीपक आलुरकर, प्रयोगशील शिक्षक- शिवाजी अंबुलगेकर (मुखेड) या व्यक्तींना शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. पृथ्वीराज तौर यांनी या पुरस्काराचे सूत्रसंचालन केले. सर्व सन्मानितांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपला आजवरचा प्रवास सांगत उपस्थितांना प्रोत्साहीत केले.

प्राध्यापक कच्छवे सर यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या अभिनव कल्पना यांनी या संमेलनाला रंगत आणली. उपस्थित संमेलनार्थी शिक्षक यांनी प्रश्न उत्तरे, चर्चा, गप्पा यात सक्रिय सहभाग घेत या संमलेनाला यशस्वी करण्यात मोलाच सहकार्य केलं. या पूर्ण संमेलनाच्या आयोजनात जिल्हा प्रमुख अजय जाधव, जनजागृती विद्यालय संस्थापक श्री गोपाळ नाईक, अक्षर मानव आजीव सदस्यांनी अथक मेहनतीने उत्कृष्ट नियोजन केले होते. या सर्वांचे अक्षर मानवच्या वतीने कौतुक करण्यात आले. श्री. गोपाळ नाईक यांनी संमलेन ठिकाण आणि स्नेह भोजनाची व्यवस्था केली होती.

या संमेलनाला अक्षर मानव नांदेड जिल्हाध्यक्ष अजय जाधव, अक्षर मानव शिक्षण विभाग अध्यक्षा नीलिमा पगारे, शेती विभाग अध्यक्ष अमित पाटील, खेळ विभाग अध्यक्ष प्रकाश पवार, पत्रकार विभाग प्रमुख हाजी शेख उपस्थित होते.

संमेलनाच्या शेवटी येत्या जानेवारी 2024 मध्ये “अक्षर मानव बाल विद्यार्थी संमेलन” घेणार असल्याची घोषणा करत, शिक्षणाच्या वेगळ्या विचारांचा, योजनांचा आणि उद्दिष्टांचा मेंदू घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची शपथ घेत संमेलनाची सांगता करण्यात आली.

Related Posts

Leave a Comment