काव्यपुष्प साहित्य मंच आयोजित “काळजातला देवमाणूस” या प्रतिनिधिक ई बुक काव्य संग्रहाचे प्रकाशन
(दिशा महाराष्ट्राची / छत्रपती संभाजीनगर)
काव्यपुष्प साहित्य मंच समूहाने जेष्ट साहित्यिक चंद्रकांतदादावा वानखेडे यांच्या १० नोव्हेंबर रोजी जन्मदिन निमित्ताने आयोजित केलेल्या ४७ व्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेतील प्राप्त १२६ रचनांपैकी प्रत्येक सारस्वत महानुभाव मान्यवरांची एक रचना अशा १०० पेक्षा अधिक रचना “काळजातला देवमाणूस” या प्रतिनिधिक ई बुक काव्य संग्रह मध्ये समाविष्ट केल्या आहे. या देदीप्यमान ई बुक काव्य संग्रहाला जेष्ट साहित्यिका मा. डॉ. नयनचंद्र सारस्वते ताईंची आशिष शब्दरुपी पाठराखण लाभली आहे.
दि.१९ नोव्हेंबर २०२३ रोजी दैनिक महाराष्ट्र साहित्य दर्पणचे दुसरे कवी संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले. या संमेलनाचे समेलनाध्यक्ष जेष्ट साहित्यिक, कवी, लेखक, प्रकाशक, गीतकार, प्राध्यापक मा. चंद्रकांतदादा वानखेडे यांच्या हस्ते, काव्यपुष्प साहित्य मंच समूह, मुंबई निर्मित काळजातला देवमाणूस या प्रतिनिधिक ई बुक काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन आणि युगंधरा प्रकाशन संस्थेचे उद्घाटन झाले. लवकरच साहित्यिकांच्या हाती काळजातला देवमाणूस हा काव्य संग्रह येईल. सर्वांनी दिलेल्या १०० हुन अधिक शुभेच्छात्मक काव्यरचना या संग्रहामध्ये आहेत.
या शुभ प्रसंगी दादांनी संमेलनाला उपस्थित सारस्वत महानुभाव मान्यवरांना मार्गदर्शन केले. यावेळी दैनिक महाराष्ट्र साहित्य दर्पणचे संपादक, मा. गुलाबराजा फुलमाळी, जेष्ट साहित्यिका मा. डॉ. नयनचंद्र सारस्वते ताई, स्वागताध्यक्ष मा. शैलेंद्र भणगे, युगंधरा प्रकाशनच्या संपादक मा. सुनिता कावसनकर मा. विलास ठोसर, मा. गणेशदादा चव्हाण, मा. कांचनजी ठाकूर, प्रकाश पाठक, मा. भैरवनाथ कानडे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कवी संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात संमेलनाध्यक्ष मा. दिनेश मोडोकर, प्रमुख पाहुणे मा. नरेंद्र पाटील, धुळे. मा. संदीप राठोड, मा. अनुराधा वायकोस, मा. पंचवटी गोंडाळे उपस्थित होते. या प्रसंगी राज्यभरातून आलेल्या प्रख्यात ३५ साहित्यिकांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या कविता सादर केल्या.
प्रामुख्याने मा. कवयित्री संध्याराणी कोल्हे, मा. ज्ञानेश्वर काळे, मा. पंडित निंबाळकर, मा. गजानन उफाडे, मा. तुकाराम कांबळे, मा. विजय जाधव, मा. सुनिता कावसनकर, मा. अशोक माळी, मा. वीणा व्होरा, मा. प्रवीण जाधव यांनी बहारदार कविता सादर करून संमेलन हसतमुख ठेवले. सुनिता कावसनकर यांच्या आभार प्रदर्शनाने दिमाखदार कवी संमेलन सोहळ्याची सांगता झाली.