Home क्रीडा लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनीटर उपक्रमात जि. प. शाळा कुडली नं.४ या शाळेचा राज्यात १६ वा नंबर तर जिल्ह्यात पहिला नंबर

लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनीटर उपक्रमात जि. प. शाळा कुडली नं.४ या शाळेचा राज्यात १६ वा नंबर तर जिल्ह्यात पहिला नंबर

Spread the love

लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनीटर उपक्रमात जि. प. शाळा कुडली नं.४ या शाळेचा राज्यात १६ वा नंबर तर जिल्ह्यात पहिला नंबर

 


दिशा महाराष्ट्राची- गुहागर / संदेश कदम

 

महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या plc स्वच्छता मॉनिटर प्रकल्पचा पहिला टप्पा २ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. प्रकल्पचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे हे समजण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा होता.

या प्रकल्पात कुडली नं.४ शाळेच्या विद्यार्थ्यांनी झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारण्यास सांगितली. असे विवरण सांगताना असे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये राज्यातील सर्वोत्तम १०० च्या यादीत कुडली नं.४ शाळेचा १६ वा नंबर आला तर जिल्ह्यात पहिला नंबर आला आहे .स्वच्छता मॉनिटर प्रकल्पमध्ये राज्यभरातून ६४१९८ शाळा तर ५९३१४१० विद्यार्थी सहभागी झाले होते. तर सोशल मीडिया मध्ये १५०००००+ व्हिडिओ share झाले होते. या प्रकल्पाचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे तसेच शालेय शिक्षण मंत्री श्री. दीपकजी केसरकर आणि उद्योगमंत्री श्री. उदयजी सामंत यांनी केला होता. शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी प्रस्तावित केलेल्या संकल्पनेला गती मिळाली आहे आणि दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची सवय होण्यावर लक्ष केंद्रित होणार आहे.

ठीक ठिकाणी प्रत्येक चुकीला कोणीना कोणी point – out केले तर सगळेच जास्तीत जास्त जागरूक राहतील आणि महाराष्ट्र निष्काळजीमुक्त बनेल अशी माहिती प्रकल्प संचालक माननीय रोहित आर्या यांनी दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका व शाळा समन्वयक श्रीमती. माधवी पाटील यांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागोजागी बेफिकिर लोकांना थांबविण्यात प्रोत्साहित केले. स्वच्छता मॉनिटर म्हणून उत्कृष्ट काम केलेले अर्पण भरत जाधव, श्रावस्ती जितेंद्र जाधव, प्रणव अविनाश जाधव, आरोही प्रबोध जाधव, अस्मि प्रबोध जाधव, सार्थक जितेंद्र जाधव, सिद्धांत अविनाश जाधव, आर्यन महेंद्र जाधव, आदिती राजेंद्र जाधव, अवनी अनिल जाधव यांना मुंबई येथील कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.

या कामी शाळेतील उपशिक्षक श्री. अजित पाटील व श्री. विराज सुर्वे यांनीही विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर चे महत्व पटवून दिले. शाळेच्या या यशाबद्दल मा.मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत तसेच गुहागर तालुका गटशिक्षणाधिकारी सौ. लीना भागवत, विस्तार अधिकारी गळवे साहेब, केंद्रप्रमुख नामदेव लोहकरे, केंद्रप्रमुख सुहास गायकवाड ,शाळा व्य. समिती, पालक, ग्रामस्थ यांनी शाळेचे अभिनंदन केले.

Related Posts

Leave a Comment