Home क्रीडा एन. के. वराडकर हायस्कूल, मुरुडच्या मुलींनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विजयाची परंपरा कायम राखली

एन. के. वराडकर हायस्कूल, मुरुडच्या मुलींनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विजयाची परंपरा कायम राखली

Spread the love

एन. के. वराडकर हायस्कूल, मुरुडच्या मुलींनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विजयाची परंपरा कायम राखली

 


दिशा महाराष्ट्राची- दापोली / आशुतोष साळुंखे

 महर्षी कर्वे शिक्षण संस्था, मुरुड संचलित एन. के. वराडकर हायस्कूल, मुरुड ता. दापोली, जिल्हा- रत्नागिरी या प्रशालेच्या मुलींनी दापोली तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी केली.

    मंगळवार दि. 10 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडलेल्या दापोली तालुका स्तरावरील मैदानी स्पर्धेत एन. के. वराडकर हायस्कूल मुरुडच्या मुलींनी बाजी मारत जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी आम्ही सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. 

   यशस्वी खेळाडूंमध्ये 14 वर्षाखालील मुली- कु. सीमा संतोष भुवड- 100 मी. धावणे- प्रथम क्रमांक तसेच लांब उडी द्वितीय क्रमांक, कु. श्रद्धा महेश बटावळे- 600 मी. धावणे- प्रथम क्रमांक, कु. रिया रामचंद्र जाधव- 400 मी. धावणे- प्रथम क्रमांक तसेच उंच उडी- प्रथम क्रमांक, कु. सायली सचिन काप- 200 मी. धावणे- द्वितीय क्रमांक, रिया विष्णू बांद्रे- 600 मी. धावणे- तृतीय क्रमांक, 4 × 100 मी. रिले- द्वितीय क्रमांक.

      17 वर्षाखालील मुलींमध्ये कु. आर्या राजेश नरवणकर- उंच उडी- प्रथम क्रमांक तसेच 100 मी. हर्डल्स- प्रथम क्रमांक, कु. वैदेही राजेश गुरव-  800 मी. धावणे- प्रथम क्रमांक तसेच 400 मी. धावणे- प्रथम क्रमांक, कु. प्रांजली राजेश बेर्डे- 200 मी. धावणे- प्रथम क्रमांक, कु. चंदना राजेश खळे- 200 मी. धावणे- द्वितीय क्रमांक, कु. रिया रुपेश तुपे- 100 मी. हर्डल्स- द्वितीय क्रमांक, कु. श्रावणी महेश बटावळे- उंच उडी- तृतीय क्रमांक, कु. तन्वी जयहिंद भुवड- 1500 मी. धावणे- तृतीय क्रमांक तसेच 4 × 100 मी. रिले- प्रथम क्रमांक. 

     दापोली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये एन. के.वराडकर हायस्कूल, मुरुड या प्रशालेने गेले कित्येक वर्ष आपले वर्चस्व दाखविले आहे. यावर्षी सुद्धा मुलींनी आपली परंपरा कायम टिकविली आहे. प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. बिपीन मोहिते सर यांचे मार्गदर्शन कायम मोलाचे ठरत आले आहे.

    प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गारडे मॅडम, संस्था अध्यक्ष श्री. विवेक भावे, सचिव श्री. विराज खोत यांनी सर्व यशस्वी खेळाडू, सहभागी खेळाडू, प्रशिक्षक श्री. बिपीन मोहिते, व्यवस्थापिका सौ. मिरवणकर मॅडम यांचे दूरध्वनिद्वारे अभिनंदन केले व जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Posts

Leave a Comment