Home क्रीडा तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री. यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री. यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी

Spread the love

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री. यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी

 


दिशा महाराष्ट्राची / दापोली

सोमवार दि. 9 ऑक्टोबर 2023 रोजी KKV मैदान दापोली येथे आयोजित मैदानी स्पर्धेत श्री. यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालय पंचनदी या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत  दापोली तालुक्यातून रत्नागिरी जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे.
     14 वर्षे वयोगट मुलांमध्ये कु. ओम अजित खळे 200 मीटर धावणे- प्रथम क्रमांक, कु. समर्थ विलास तेरेकर ह्याने उंच उडीत द्वितीय क्रमांक पटकावला.
      17 वर्षे वयोगट मुलांमध्ये कु. स्मित शरद काष्टे 5 km चालणे यामध्ये प्रथम क्रमांक, कु. तनिष योगेश रहाटे 5 km चालणे यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. कु. समर्थ राजेंद्र राणे याने 100  मी. हर्डल्स या खेळ प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. तालुक्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी SVJCT डेरवण चिपळूण येथे होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
       पुढील विद्यार्थी एक एक टप्पा पुढे जात सेमी फायनल मध्ये पात्र ठरले होते परंतु अंतिम फेरीत ते यशस्वी होऊ शकले नाहीत. मात्र चांगली झुंज देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून आला. कु. मिथिलेश विष्णू म्हातले-  400 मी. धावणे अंतिम फेरीत पर्यंत मजल, कु. हर्ष रवींद्र रहाटवळ- 200 मी. धावणे- अंतिम फेरी पर्यंत मजल, कु. समर्थ विलास तेरेकर- 400 मी. धावणे अंतिम फेरी पर्यंत मजल अशी कामगिरी सदर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केली आहे.
    सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम श्री. आशुतोष साळुंखे सर यांनी केले. यशस्वी विद्यार्थी, क्रीडा मार्गदर्शक व व्यवस्थापिका सौ. अर्चना मकू मॅडम यांचे अभिनंदन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुनील देसाई, सहा. शिक्षक श्री. समाधान पैठणे सर यांनी केले. लोकमान्य लोकोपकारक मंडळ पंचनदी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य / पदाधिकारी व पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Related Posts

Leave a Comment