Home साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा  राजश्री बोहरा “भारत गौरव पुरस्काराने” सन्मानित

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा  राजश्री बोहरा “भारत गौरव पुरस्काराने” सन्मानित

Spread the love

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा  राजश्री बोहरा “भारत गौरव पुरस्काराने” सन्मानित

 


दिशा महाराष्ट्राची- ठाणे

 अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश अध्यक्षा सौ. राजश्री बोहरा यांना भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांना रविवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी, पुणे येथे १५ वे अखिल भारतीय कर्तव्यम प्रेरणा महासंमेलन २०२३ या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
श्री संजीव जैंथ (संचालक G20 सचिवालय, श्रम रोजगार मंत्रालय नवी दिल्ली), ब्रिगेडियर श्री राजेश गायकवाड (महासंचालक सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य),  श्री अतुल निकम (संचालक नेहरू युवा  केंद्र, युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय – भारत सरकार), महाराज श्री शिवाजीराजे जाधव (राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे वंशज), महाराज श्री विजयसिंहराजे भोसले (तंजावर घराण्याचे वंशज), श्री भूषण गोखले (एअर मार्शल – भारतीय वायूसेना), श्री प्रदीप बापट (एअर मार्शल- भारतीय वायुसेना), श्री सुनील पवार (अप्पर आयुक्त) या भारतातील दिग्गज विभुतींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

मराठी साहित्यसृष्टीत दिलेल्या विशेष योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. सबंध भारतातील विविध कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या विशेष प्रतिभावान व्यक्तींचा समावेश या पुरस्कारासाठी करण्यात आला होता.

Related Posts

Leave a Comment