समाजसेविका सुवर्णा कदम समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)
सौ. सुवर्णताई कदम यांचे महिलांबद्दल चे कार्य पाहून श्री साई धनवर्षा फाउंडेशन यांच्या माध्यमातून सौ सुवर्णाताई कदम यांना समाज रत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.
गेले सात ते आठ महिन्यापासून सतत त्या महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मोफत कोर्सेस महिलांना देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा एक अप्रतिम मार्ग त्या नेहमीच देत असतात. गेले तीन ते चार वर्षापासून त्यांचे महिलांसाठीच कार्य खूपच मोठे आहे. यामध्ये कोरोना काळात पाहिलं तर लोकांना इंजेक्शन उपलब्ध करून दिले, औषध उपलब्ध करून दिले, ऑक्सिजन उपलब्ध करून देणे, बेड उपलब्ध करून देणे यापासून ते थेट त्यांच्या अगदी फॅमिली मॅटर पर्यंत तसेच वयोवृद्धांच्या प्रश्नांपर्यंत त्यांनी तळागाळात जाऊन कार्य केलेले आहे आणि याच कार्याचा गौरव करून त्यांना विविध संस्थांकडून त्यांना बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत.
हे कार्य त्यांचे अखंड चालूच आहे सध्या महिलांसाठी त्यांनी मोफत कोर्सेस चालू केलेले आहेत. त्यामध्ये मेहंदी कोर्स, ज्वेलरी मेकिंग कोर्स, हेअर स्टाईल, साडी ड्रेसिंग कोर्स, शिलाई कोर्स, बालवाडी, अंगणवाडी कोर्स, प्राथमिक शिक्षिका कोर्स, अर्ली चाइल्ड वूड केअर कोर्स तसेच डीएड बी एड अशिक्षित महिलांना प्रौढ शिक्षण वर्ग तसेच हे सर्व उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर त्यांना नोकरी सुद्धा उपलब्ध करून देतात त्यामुळे अर्थातच त्यांच्या कुटुंबाला खूप मोठा हातभार लागत असतो.
तसेच त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून मुलांनाही ज्यांचे शिक्षणा पूर्ण राहिले आहे अशा मुलांना त्यांचे शिक्षण पूर्ण करून देणे तसेच नोकऱ्या उपलब्ध करून देणे असेच बरेच प्रकारचे कार्य सुवर्णाताई कदम आरंभ सोशल फाउंडेशन आणि युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिलच्या माध्यमातून महिलांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे समाजामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं कौतुक होत आहे. साई धन वर्ष फाउंडेशन ने त्यांना समाज रत्न हा पुरस्कार तर तिलाच पण त्याचबरोबर दिव्यामधील भारतीय जनता पार्टीचे दिवा ओबीसी अध्यक्ष श्री रोशन दादा भगत आणि सपना ताई भगत यांनी भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री संजय वाघोले सर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना नारी सन्मान या पुरस्काराने देखील संबंधित केले गेले. त्यांना कोणाचाही पाठिंबा नसताना तसेच कुठलेही आर्थिक पाठबळ नसताना त्या स्वतःच्या जिद्दीवर हे सर्व करत आहेत.