भांडूप मध्ये आधारभिंतींचा प्रश्न एरणीवर- वंचित च्या मुंबई उपाध्यक्ष स्नेहल सोहनी आक्रमक
(दिशा महाराष्ट्राची- मुंबई)
भांडूप विभागांत पावसाळी पाहणी दौरा करत असताना नागरिकांनी अनेक समस्या सांगितल्या. त्यात प्रामुख्याने आधार भिंतीचा विषय प्रचंड महत्वाचा असून त्याबाबत वंचित च्या माध्यमातून स्नेहल सोहनी स्वतः काही वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. परंतु प्रशासनाकडून अपेक्षित असलेली हालचाल झाली नाही.
स्नेहल सोहनी यांनी प्रशासनास धोकादायक भिंतीचा प्रश्न मांडला असून त्याचा संबंधित bmc अधिकारी व म्हाडा अधिकारी यांना जाब विचारला असता BMC प्रशासन म्हाडाकडे, तर म्हाडा BMC कडे बोट दाखवत नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. अशा अत्यंत धोकादायक परिस्थितीतही प्रशासन प्रचंड उदासीन असल्याचं दिसत आहे.
आपण पाठपुरावा करत असतानाच भांडुप मधील एक भिंत 28 जून रोजी पडल्याची घटना झाली. त्यावेळी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण प्रशासन जीवित हानी होण्याची वाट बघत आहे का असा सवाल वंचित च्या मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी प्रशासनास केला आहे.
BMC प्रशासन आणि म्हाडा एकमेकांची बोट एकमेकांकडे दाखवण्यात व्यस्त आहे. अशा वेळी सामान्य नागरिकांनी जायचं तरी कोणाकडे? प्रशासनाने लवकरात लवकर आधार भिंतीचा विषय निकाली काढला निघावा यासाठी जिल्हाधिकारी यांची देखील आपण भेट घेणार असून वेळप्रसंगी वंचित बहुजन आघाडी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती वंचितच्या मुंबई उपाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी दिली आहे.