Home शैक्षणिक मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर प्रा. हनुमंत सुतार यांची सदस्य म्हणून निवड

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर प्रा. हनुमंत सुतार यांची सदस्य म्हणून निवड

Spread the love

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर प्रा. हनुमंत सुतार यांची सदस्य म्हणून निवड

 


(दिशा महाराष्ट्राची- मंडणगड)


 

मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भूगोल विशयाचे सहाय्यक प्राध्यापक हनुमंत एकनाथ सुतार यांची नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. यानिमित्ताने शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने मा. प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

दि. 5 जुलै 2023 रोजी यासाठी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक झाली होती. प्रा. हनुमंत सुतार हे गेल्या 26 वर्षापासून मुंडे महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारी- निमसरकारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या मंडणगड तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.

प्रा. हनुमंत सुतार यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पदमश्री कर्मवीर दादा इदाते, संस्थाध्यक्षा सौ. संपदा पारकर, कार्याध्यक्ष श्री. श्रीराम इदाते, कार्यवाह श्री. सतीश शेठ, संस्थापदाधिकारी, स्थानिक संचालक, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Posts

Leave a Comment