Home शैक्षणिक पुण्यातील अजिंक्य देडगे पब्लिक स्कूलमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती साजरी

पुण्यातील अजिंक्य देडगे पब्लिक स्कूलमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती साजरी

Spread the love

पुण्यातील अजिंक्य देडगे पब्लिक स्कूलमध्ये राजश्री शाहू महाराज जयंती साजरी

 


(दिशा महाराष्ट्राची/ पुणे- मेघना सुर्वे)

 

पुण्यातील नांदेड गावात अजिंक्य देडगे पब्लिक स्कूलमध्ये नुकतीच राजश्री शाहू महाराज जयंती अभिनव पद्धतीने सादर करण्यात आली. यानिमित्ताने डॉ. नितीन हांडे यांचे ‘विज्ञान जन्मते कुतूहलातून’ या विषयावर खास व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

मानवाचा इतिहास हा प्रश्न पडण्याचा आणि त्यातून उत्तर शोधण्याचा इतिहास आहे. का? कसे? असे प्रश्न आदिमानवाला पडत गेले आणि त्यातून विज्ञान विकसित होत गेले. आजच्या पिढीलाही अनेक प्रश्न पडतात, मात्र त्यांचे कुतूहल शमवले जात नाही तर दाबले जाते. या युवा पिढीच्या कुतूहलाला खतपाणी घालण्यासाठी सदर कार्यक्रम घेण्यात आला होता.

हातचलाखी, रसायनांचा वापर किंवा भौतिकशास्त्राचे नियम यापैकी कोणत्याही गोष्टींचा वापर न करता जगात कधीही कुठेही चमत्कार होऊ शकत नाही हे मुलांना पटवून देण्यात आले. प्रत्येक गोष्ट तर्क, प्रयोग, निरिक्षण, अनुमान आणि प्रचिती यांच्या पातळीवर कशी सखोल तपासून पाहायची याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

त्यानंतर मुलांमधील भीती कुतूहल यांचा मागोवा घेत भूताच्या गप्पा झाल्या. इंद्रियजन्य भ्रम कसे होतात आणि भुताबाबत स्वयंसूचना कशा दिल्या जातात याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी असे कार्यक्रम घेणे हेच तर्कनिष्ठ शाहू महाराजांच्या विचारांना यथार्थ, कृतिशील अभिवादन आहे असे डॉ. हांडे म्हणाले.

सदर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहुल मोकाशी तसेच शाळेतील शिक्षक वर्गाने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Related Posts

Leave a Comment