दामोदर नाट्यगृहात रंगणार कोकणचा जाखडी नृत्य- सोबत पैठणी साड्यांचा “लकी ड्रॉ” कोण जिंकणार पैठणी उत्सुकता शिगेला
(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई- उदय दणदणे)
महाराष्ट्रात लोककलेला फार महत्व प्राप्त आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाहीरांनी विविध लोककलेच्या माध्यमातून जनप्रबोधन करत एकतेची मोठी चळवळ उभी केली होती.
आज महाराष्ट्रातील अनेक लोककला लोप पावत असताना कोकणातील बहुप्रिय “जाखडी नृत्य” पारंपरिक शक्ती- तुरा ही लोककला कोकणात आजही अनेक गाव- वाडी कुशीत पिढ्यानपिढ्या जोपासण्याचे कार्य अनेक गाव मंडळे, कलाकार, शाहीर वर्ग, कलाकारांच्या मातृसंस्था, आयोजक मंडळी करत आहेत. त्यातीलच एक अल्पवधीत नावलौकिक मिळवलेलं आयोजनात अव्वल स्थान निर्माण करून मुंबई रंगमंचावर नमन, जाखडीनृत्य (शक्ती-तुरा) ह्या लोककलांचे आयोजन करून अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे कोकणातील अग्रगण्य संस्था अर्थात “श्री पाणबुडी देवी कलामंच” (पाचेरी सडा-गुहागर) मुंबई होय.
“श्री पाणबुडी देवी कलामंच” आयोजित ह्या मोसमातील पाहिले आयोजन जाखडीनृत्य (शक्ती-तुरा) चा सामना शक्तीवाले- शाहीर राजेश निकम (ता. खेड- सवेणी) आणि तुरेवाले- शाहीर सचिन धुमक (चिपळूण- ढाकमोली) अशा ह्या सुप्रसिद्ध युवा शाहिरांची जुगलबंदी शक्ती- तुरा कार्यक्रम शनिवार दिनांक १ जुलै २०२३ रोजी रात्रौ ८.३० वा. दामोदर नाट्यगृह परेल, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.
रसिकांनी आजवर आमच्या प्रत्येक उपक्रम आयोजित कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद देत मुबंई रंगमंचावर होणाऱ्या कार्यक्रमांना हाऊसफुल्ल बोर्डचा बहुमान मिळवून दिला आहे आणि या पुढेही देतील असा विश्वास व्यक्त करत सदर होणाऱ्या कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांच्या सन्मानार्थ पाच पैठणी साड्यांचा “लकी ड्रॉ” चे नियोजन करण्यात आले असून कुटुंबासमवेत पाहण्यायोग्य ह्या कार्यक्रमाला तमाम कला रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी: ९९३०५८५१५३ / ८८५०४२२७११ ह्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन उपरोक्त संस्थेचे संस्थापक संतोष घाणेकर व प्रतिनिधी दिपक कारकर, रमेश कोकमकर, रमेश भेकरे यांनी केले आहे.