शेतकरी करणार वसुंधरेचे संरक्षण आणि इंधन क्रांती- श्रीकांत करजावकर
(दिशा महाराष्ट्राची/ नवी मुंबई/ मंगेश जाधव)
चिपळूण येथे भव्य शेतकरी भव्य उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न
आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून गणला जात होता. भारत देश हा जगावरती राज्य करीत होता. आपला भारत देश सुजलाम सुफलाम होता. परंतू आज परिस्थिती वेगळी आहे. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला तरीही आपण पारतंत्र्यातच आहोत. इंग्रजांनी आपली मानसिकता नष्ट केली आहे औद्योगिक क्रांतीमूळे नोक-या मिळाल्यापण प्रदुषणामूळे ऱ्हासही झाला आहे. पर्यावरण दुषीत होत आहे जागतिक तापमान वाढत आहे पाण्याची पातळी घटत चालली आहे पिण्याचे पाणी नष्ट होत आहे जंगलाला वनवे (आगी) लागत आहेत यावेळी वसुंधरेचे संरक्षण करणे ,संगोपण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे त्यामूळे एम.सी.एल च्या माद्यमातून आणि झोलाई अॕग्रो अॉरगॕनिक प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चिपळूण तालुका यांचे वतीने शेतकरी वसुंधरेचे संरक्षण करणार आणि नेपीअर गवता पासून होणार इंधन क्रांती असा ठाम विश्वास एम.सी.एलचे प्राईम बिडीए श्री. श्रीकांत करजावकर सर यांनी व्यक्त केला
चिपळूण तालुक्यातील डि.बी.जे.कॉलेजच्या सभागृहात भव्य शेतकरी आणि भव्य उद्योजक मेळावा नुकताच उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात सर्व कार्यकारणी सदस्य , कोअर टीम , एम.व्हि. पी. , बिडीए , चॕनल पार्टनर , पत्रकार यांना वृक्ष भेट देऊन सन्माणीत करण्यात आले
यावेळी प्रमूख मार्गदर्शक म्हणून एम.सी.एल.कंपनीचे प्राईम बिडीए श्री.श्रीकांत करजावकर सर बोलत होते
श्री.श्रीकांत करजावकर सर पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपण आतापर्यंत चिपळूण तालुक्यात हजारो शेतक-यांचे संघटन केले पाहिजे शेतकऱ्यांना संघटीत करुन आणि शेतक-यांची एकजुट करुन आपल्या कोकणात शेती शेतीपूरक व्यवसायांना चालना दिल्या पाहिजे आपण शेतकरी उत्पादक संस्थेच्या माध्यमातून शेतीतल्या रॉमटेरीयल पासून इंधन तयार करणार आहोत नेपीअर गवतापासून जैविक इंधन तयार करणार आहोत प्रोसीसींग करुन मार्केटींग करणार आहोत , सेंद्रीय खते , असे अनेक प्रकल्प आपल्या गावात ऊभे करणार आहोत हजार रुपये टनाने गवत विकत घेतले जाणार आहे एम.सी.एल.च्या माद्यमातून गवतापासून इंधन तयार केले तर फार मोठी क्रांती करु शकतो इंधना वरती कोळशावरती उर्जा तयार केली जाणार आहे प्रत्येक गावात केंद्र निर्माण करुन स्थानिक महिलांना ,तरुणांना प्रशिक्षण देऊन महिना ४०,००० ते १ लाख रुपये कमवीण्याची संधी आपल्या गावात देणार आहोत त्या करिता प्रत्येक गावात MVP एम सी एल प्रकल्प केंद्र स्थानिकांना चालवण्यासाठी देण्यात येणार आहे याचा फायदा उद्योजक होउ पाहणाऱ्या सर्वाना होईल या उद्योगामुळे प्रदुषण टळेल आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचा आणि तालुक्याचा नक्की विकास होईल असा विश्वास एम. सी. एलचे प्राईम बिडीए श्री. श्रीकांत करजावकर सर यांनी व्यक्त केला
यावेळी सचिन मोहिते , तालुका कृषी अधिकारी शाहू पवार ,कृषि सहाय्यक विकास पिसाळ , संदिप गोरीवले , संतोष दवंडे , यांनीही आपले विचार मांडले
यावेळी श्री. दिनेश कासेकर , संजय भागवत , सचिन मोहिते , संदिप गोरीवले , संतोष घुमे , सिध्देश मोरे , प्रभाकर धावडे , संतोष दवंडे , रश्मी मेस्त्री , अपूर्वा कानेकर , रेवती साळवी , विकास टाकले , कृष्णाजी कोकमकर ,संतोष बुधर , आत्माराम भोमकर , प्रकाश घाग , सायली मोरे , सुनिल दुर्गवली , सागर कांबळे यांचेसह सर्व कार्यकारणी सदस्य ,कोअर टीम , एम . व्हि. पी. , बिडीए , चॕनल पार्टनर , हे बहूसंख्येने उपस्थित होते .शेवटी सचिन मोहिते यांनी सर्वांचे आभार मानले.