जागतिक पर्यावरण दिनानिमित्त UHRC तसेच आरंभ शोषल फाउंडेशनच्या मार्फत दिवा येथे वृक्षारोपण
(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिवा दातिवली येथे युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारत च्या महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा आणि आरंभ सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सौ सुवर्णाताई कदम यांच्या माध्यमातून दातिवली येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यामध्ये वड, कडूनिंब, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सध्या उन्हाळ्याची वाढते तापमान आणि पर्यावरणाचा होणारा रहास बघता वृक्षारोपण करण्याची खूप गरज आहे आणि फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही तर त्या वृक्षांची काळजी घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. वेळोवेळी त्यांना पाणी देणे, त्यांची निगा राखून त्यांची वाढ करणे खूप गरजेचं आहे.
या कार्यक्रमात आरंभ सोशल फाउंडेशनच्या सर्व महिला सहभागी झाल्या होत्या. तसेच नर्सिंग युनिटच्या शिक्षिका सौ ज्योती नारंगी कर मॅडम आणि आरंभ सोशल फाउंडेशनच्या हेमा म्हात्रे, आरती आटनेरे, अमृता नाईक, प्रियांका कोरी, गंगा विश्वकर्मा, श्वेता गुप्ता, मयुरी राजापकर, सीमा पटेल, श्रावणी डोंगरे, अक्काताई देवर्षी, संजना गुप्ता, अनिता गुप्ता, पूजा गुप्ता, अमिता गौतम, चेतना क्षीरसागर आणि बऱ्याच लहान मुलांचा समावेश होता.
खूप उत्साहाने आणि आनंदाने सर्वांनी वृक्षारोपण केले. प्रियंका कोरी, आरती अमृता नाईक यांनी या वृक्षांची रोज काळजी घेण्याची ठरवले त्याबद्दल त्यांचे कदम यांनी आभार मानले.