सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे अंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल दमामे- तामोंड- भडवळे – कात्रण शाळेची माजी विद्यार्थी सभा संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ दापोली)
विज्ञान प्रदर्शन आणि स्कूल च्या रौप्य महोत्सवी वर्ष कार्यक्रम नियोजन बाबत आज छबिलदास हायस्कूल, दादर येथे न्यू इंग्लिश स्कूल दमामे- तामोंड- भडवळे- कात्रण यांची माजी विद्यार्थी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस प्रमुख पाहुणे म्हणजे न्यू इग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक अतुलजी पितले सर हे उपस्थित होते. या सभेचे अध्यक्ष मारुती शिगवण हे होते तसेच काही ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वप्रथम मुख्याध्यापक पितले सरांनी कार्यक्रम नियोजन आढावा सदर केला आणि विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील एकूण १८० शाळा सहभागी होणार असून या वर्षी यजमानपद आपल्या शाळेला दिल्याची आनंदाची बातमी दिली आणि पुढील नियोजन बाबत आपली भूमिका मांडली त्यावर उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्यात चर्चा झाली. डिसेंबर अखेरीस हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आजच्या सभेस विकास जाधव, मधुकर हरावडे, मारुती बंगाल, सुनील हरावडे, सागर विटमल, सुशांत जाधव, विनोद हरावडे आणि इतर ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.
आजची सभा यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी हरेश हरावडे, सुधीर राऊत, प्रदिप जाधव यांनी मुख्य भूमिका घेतली आणि सभा यशस्वी पार पाडली.