लोकभारती च्या माध्यमातून दिवा येथे महिलांसाठी मोफत हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)
युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारत च्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष आणि आरंभ सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुवर्णाताई कदम यांनी लोकभारती च्या माध्यमातून महिलांसाठी मोफत हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित केले होते.
यामध्ये 14 वर्षे ते पुढच्या सर्व महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये रक्तातील लोहाचे प्रमाण शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण विटामिन डी आणि विटामिन बी 12 तसेच सीबीसी म्हणजेच प्लेटलेटस चे शरीरातील प्रमाण चेकअप शिबिर आयोजित केले होते. यामध्ये जवळजवळ ७२ महिलांनी सहभाग घेतला. या सर्व महिलांचे हेल्थ चेक अप करून त्यांना लवकरच रिपोर्ट देणार त्याचबरोबर मोफत पुढील औषधे सुद्धा देण्यात येणार असल्याचे सांगितले.
आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आणि युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारत च्या माध्यमातून नेहमीच महिलांसाठी काही ना काही उपक्रम राबवले जातात. सौ सुवर्णाताई कदम यांनी डिसेंबर पासून महिलांसाठी मोफत प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. या प्रशिक्षण केंद्राचा 243 महिला लाभ घेत असून या प्रशिक्षणाच्या उद्देशाने भरपूर महिला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम होत आहेत. त्यामुळेच महिला वर्गातून एक समाधानाचं वातावरण पसरलेले आहे.
त्याचबरोबर बऱ्याचशा विधवा आणि घटस्फोटीत महिलांना लोकभारतीच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी मदत सुद्धा प्रशिक्षण प्रमाणपत्रासह देण्यात येते. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजेच महिला व बालकल्याण विभागाकडून विधवा महिलांसाठी मोफत शिलाई मशीन सुद्धा वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे 20 ते 45 वयोगटातील दिव्यातील सर्व विधवा महिलांना याचा लाभ घेता येणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व महिलांचे तसेच तसेच लोकभारतीचे श्री विनोद कुमार सिंह, श्रीमती किरण विनोद कुमार सिंह, लॅब असिस्टंट श्री सुनील पवार सर तसेच या शिबिरास महत्त्वाचे सहकार्य करणाऱ्या कु. वैष्णवी सुनील कदम यांचेही सौ. कदम यांनी आभार मानले.