टी एम जी क्रिएशन आयोजित राष्ट्रीय कार्यकर्तृत्व सन्मान सोहळा वाशी येथे संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)
टी एम जी क्रिएशन या राष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कार्यकर्तृत्व सन्मान सोहळा रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी वाशी येथील साहित्य मंडळ सभागृहात संपन्न झाला. विविध क्षेत्रात अनमोल योगदान देणाऱ्या व्यक्तींना सलाम इंडिया हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारासाठी डोंबिवली (पू) शिवसेना शहर संघटक, जनकल्याण सेवा फाउंडेशन, नारी शक्ती विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौ. स्वाती हिरवे तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा अध्यक्षा कवियत्री अनिता गुजर, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष कवी अविनाश ठाकूर, ठाणे जिल्हा उपाध्यक्षा कवियत्री मुग्धा कुंटे यांना सलाम इंडिया हा राष्ट्रीय कर्तुत्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात अनेक दिग्गज उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन MVS संस्थेच्या प्रमुख संयोजक मा. सलमा एन.खान संचालिका टी. एम. जी. क्रियेशन व संस्थेचे संस्थापक मा. एन. डी. खान यांनी केले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. मनोज वसंत बाडकर (म. महानिरीक्षक तटरक्षक पदक, कमांडर, तट रक्षक पश्चिम क्षेत्र, प्रमुख अतिथी म्हणून माननीय नीलांबरी भोसले (कामगार उपायुक्त), मा. चिन्मयी सुमित (सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री) मा. डॉ.सलीम शेख (अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन) मा. डॉ. रमा भोसले (शिक्षणतज्ञ तथा प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय), मा. विसूभाऊ बापट (कुटुंब रंगलय काव्यात फेम), मा. नंदेश उमप (सुप्रसिद्ध गायक व शाहीर) तसेच सन्माननीय अतिथी मा. सुरेश कोत (सी.ई ओ.लिज्जत पापड), मा. ॲड. संगीता रोकडे (प्रख्यात समाजसेविका), मा. राजश्री काळे (नाट्य सिने अभिनेत्री) इत्यादी दिग्गजांच्या उपस्थिती सलाम इंडिया पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला.