आरंभ सोशल फाउंडेशन आयोजित व्यवसाय प्रशिक्षण शिबीर संपन्न- सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप
(दिशा महाराष्ट्राची- ठाणे)
दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी आरंभ सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ सुवर्णताई कदम यांच्या माध्यमातून घेतले गेलेल्या दोन दिवसाच्या व्यवसाय प्रशिक्षणाची प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सलाम बालक ट्रस्ट चाइल्ड हेल्पलाइन 1098 च्या अमिता चव्हाण आणि कावेरी मॅडम उपस्थित होत्या. नर्सिंग युनिटच्या सौ ज्योती मॅडम उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास जवळजवळ शंभर महिलांनी उपस्थिती दाखवली. या प्रशिक्षणामध्ये महिलांना व्यवसाय कसा करावा, आपल्या व्यवसायाची जाहिरात कशी करावी, सोशल मीडियावर त्याचं प्रेझेंटेशन कसं करावं अशा अनेक विषयांवरती प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये महिलांनी फॉर्म भरले होते ज्यामध्ये मी स्वतःचा व्यवसाय कोणता व कसा उभा करेन यामध्ये दोन महिलांचे व्यवसायाचे प्रस्ताव लर्निंग लिंक फाउंडेशन ला सिलेक्ट झाले आणि या महिलांना प्रत्येकी 5000/- रुपये बक्षीस मिळाले त्याबद्दल लर्निंग लिंक फाउंडेशनच्या मंगल ताई वाघ आणि चंद्रकांत अहिरे सरांचे सुवर्णाताई कदम यांनी धन्यवाद मानले आणि यापुढेही असंच सहकार्य मिळावं ही अपेक्षा व्यक्त केली.
सदर कार्यक्रमासाठी आरंभ सोशल फाउंडेशनच्या कमिटी मेंबर्स यांनी खूप मेहनत घेतली. गुंजा गुप्ता, मालती विभुते, निर्मला मादगुडे, नम्रता शेलार, गंगा विश्वकर्मा, राणी गुप्ता, अमिता गौतम, रंजना गुप्ता, ज्योती पाटील, रेणुका पाटील अशा सर्व महिलांचे कदम यांनी आभार मानले.