युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारत तर्फे दिवा येथील भटक्या प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पाण्याची सोय
(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)
युनिव्हर्सल ह्युमन राइट्स कौन्सिल भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तरुण जी बाकोलीया आणि राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुमन जी मोरया, राष्ट्रीय महासचिव संदीप भोज, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय चव्हाण, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णाताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिवा येते रस्त्यावरील फिरणाऱ्या भटक्या प्राण्यांसाठी वाढत्या उन्हाचा त्रास लक्षात घेऊन प्राण्यांसाठी ठीक ठिकाणी पाण्याचे टप बादल्या ठेवून जनजागृती करण्यात आली. तसेच छतालाही पशुपक्ष्यांसाठी पाण्याची पॉट्स लावण्यात आले.
लोकांना वेळोवेळी त्यामध्ये पाणी ओतून अशा प्राण्यांना लागणारी पाण्याची गरज पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमात दिव्यातील बऱ्याच महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दिवा पोलीस स्टेशनचे महाराष्ट्र पोलीस रवींद्र देसले साहेब आणि कांबळे साहेब उपस्थित होते. त्याचबरोबर ठीक ठिकाणी तेथील रहिवाशांना घेऊन जनजागृती करून त्यांना अशा प्राण्यांसाठी पाण्याची अन्नाची व्यवस्था करण्यास सांगितले.
या कार्यक्रमास दिवा येथील ज्योतीमाला अभिवंत, मालती विभुते, निर्मला मादगुडे, राणी गुप्ता, गुंजा गुप्ता, सोनम गुप्ता, रेश्मा मादगुडे, नम्रता शेलार, रेणुका पाटील, ज्योती पाटील, अमिता गौतम, रंजना गुप्ता, कविता गायकवाड, सिद्धी, अथर्व पाटील, विद्या चव्हाण इत्यादी महिलांनी उपस्थित राहून खूप छान पद्धतीने सहकार्य केले त्याबद्दल सर्व महिलांचे मनापासून धन्यवाद मानले गेले. तसेच आपल्या ग्रुपमधील ही सर्व सभासदांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या जवळपास अशा प्रकारे मुक्या जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी सुवर्णा कदम यांनी सर्वांना विनंती केली आहे.